टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. त्यातच इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल 2023च्या हंगामाचा छोटा लिलाव डिसेंबर महिन्यात होणार आहे. या लिलावासाठी एक चॅम्पियन खेळाडूही उपलब्ध असण्याची शक्यता आहे. ज्याच्यावर आयपीएलमधील अर्ध्यापेक्षा अधिक संघ बोली लावताना दिसतील. तो दुसरा, तिसरा कोणी नसून इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आहे.
ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या पुरूष संघाच्या आठव्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला आणि दुसऱ्यांदा चषक उंचावला. या सामन्यात बेन स्टोक्स (Ben Stokes) याने विलक्षण अष्टपैलू कामगिरी केली. त्याने गोलंदाजी करताना एक विकेट घेत लक्ष्याचा विजयी पाठलाग करताना नाबाद 52 धावांची खेळीही केली.
स्टोक्स आयपीएल 2021चा हंगाम राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला होता, तर 2022च्या हंगामासाठी तो उपलब्ध नव्हता. रिपोर्ट्सनुसार, पुढील महिन्यात होणाऱ्या मिनी ऑक्शनमध्ये तो सहभागी होऊ शकतो.
या लिलावामध्ये सर्वात आधी तर राजस्थान स्टोक्सला आपल्या संघात ठेवेल, मात्र संघात आधीच अनेक अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. अशात राजस्थान त्याच्यासाठी मोठी किंमत मोजणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई इंडियन्स त्याला आपल्या संघात घेऊ शकते, कारण त्यांना अजूनही हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याची रिप्लेसमेंट मिळाली नाही. काही आणखी संघ आहे. जे त्याच्यावर बोली लावण्याच्या शर्यतीत आहेत.
स्टोक्सने 2017च्या हंगामातून आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट यांच्याकडून पदार्पण केले होते. त्या हंगामात त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिला सामना खेळताना कायरन पोलार्ड याची विकेट काढली होती. त्या सामन्यात त्याने 4 षटकात 36 धावा देत एक विकेट घेतली होती. फलंदाजी करताना 21 धावा केल्या होत्या. तो सामना पुण्याने 7 विकेट्सने जिंकला होता. आतापर्यंत त्याने 43 सामने खेळताना 2 शतकांच्या सहाय्याने 920 धावा आणि 28 विकेट्स घेतल्या आहेत. Ben Stokes will be available for the IPL mini-auction
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धच्या टी20-वनडे मालिकांसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; दोन दिग्गजांना वगळले, तर नेतृत्वाची कमान…
सचिनसाठी 15 नोव्हेंबरचा दिवस आहे ‘मास्टर ब्लास्टर’; क्रिकेटमधील पदार्पण, निवृत्तीशी आहे खास कनेक्शन