2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर नरेंद्र मोदींनी 9 जूनला संध्याकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर मोदी 3.० मध्ये कोणते मंत्रिपद कोणाकडे सोपवणार याकडे सर्वांचे लक्ष्य होते. परंतु आता मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची बातमी समोर येत आहे.
यापूर्वी, मांडविया 2021 पासून मोदी सरकारमध्ये आरोग्य मंत्रालय सांभाळत होते. मनसुख मांडविया हे गुजरातमधून आले आहेत आणि अनुराग ठाकूर यांच्या जागी ते क्रीडा मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतील.
मांडविया यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत होते आणि 2002 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत ते सर्वात तरुण आमदार झाले होते. मनसुख मांडविया पालिताना मतदारसंघातून विजय मिळवून गुजरात विधानसभेत पोहोचले होते. मांडविया अनेक वर्षे गुजरातमध्ये राज्य सचिव राहिले आहेत. अखेर 2012 मध्ये ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते.
मांडवियाच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर मांडवियानं भावनगर विद्यापीठातून सामाजिक शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट अँड रिसर्चमधून त्यांनी याच क्षेत्रात पीएचडीही केली आहे. मनसुख मांडविया गुजरातच्या पोरबंदर मतदारसंघातून विजयी झाले आहेत, जिथे त्यांनी काँग्रेसच्या ललित वसोया यांचा 4 लाख मतांच्या फरकानं पराभव केला आहे.
आता मनसुख मांडवियासमोर पहिलं आव्हान पॅरिस ऑलिम्पिक 2024चं असण्याची शक्यता आहे. कारण पॅरिस ऑलिम्पिकची तयारी पूर्ण झाली असली तरी त्यानंतर मनसुख मांडविया भारतातील खेळांबाबत कोणतं मोठं निर्णय घेतात हे पाहणंदेखील महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेनं जिंकला टाॅस; प्रथम फलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
दु:खद बातमी! मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन
“तुम्ही कोणीही असला तरी असं करु शकत नाही…” गावसकरांचा सिराजला टोला