मागील काही दिवसांपासून क्रिकेट जगतात एक विषय चांगलाच चर्चेत आहे, तो म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे केलेली तक्रार. खरं तर, पीसीबीने भारतात सुरू असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेदरम्यान आयसीसीकडे तक्रार केली होती की, अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूंशी गैरवर्तन केले गेले. त्यांच्या मते, स्टेडिअममधील प्रेक्षकांनी खेळाडूंशी योग्य व्यवहार केला नाही. मात्र, पाकिस्तानच्या कोणत्याच खेळाडूने यावर ब्र सुद्धा काढला नव्हता. मात्र, आता त्यांनी भारतात त्यांच्यासोबत होत असलेल्या व्यवहाराविषयी आपले मत मांडले आहे.
काय म्हणाले पाकिस्तानी खेळाडू?
बुधवारी (दि. 18 ऑक्टोबर) रात्री स्टार स्पोर्ट्सने एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये कर्णधार बाबर आझम, शादाब खान, इमाम उल हक आणि शाहीन आफ्रिदी हे खेळाडू दिसत आहेत. या व्हिडिओची सुरुवात बाबर आझम (Babar Azam) याच्या वक्तव्याने होते, ज्यात तो म्हणतो की, “जवळपास सर्वच खेळाडू पहिल्यांदाच भारतात आले आहेत.” यानंतर शादाब खान (Shadab Khan) म्हणतो की, “इथे येऊन एक वेगळीच उत्सुकता आहे. आतापर्यंत खूप चांगला पाहुणचार होत आहे. भारतातील उत्सुकता वेगळ्याच दर्जाची आहे.”
यानंतर बाबर म्हणतो की, “आम्ही आमच्या खेळाचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. कारण, ही संधी वारंवार येत नाही. प्रत्येक स्टेडिअमची एक वेगळीच अनुभूती आहे. आम्ही प्रयत्न करू की, जिथेही सामना होत आहे, त्याचा आनंद घेऊ.” तसेच, शाहीनही म्हणाला की, “आमचा संपूर्ण देश आमच्याकडून अपेक्षा करत आहे की, आम्ही चांगले क्रिकेट खेळावे.”
.@babarazam258, #ShahidAfridi & other 🇵🇰 players are thrilled to be in India. Ready to play their hearts out, watch them talk about how amazing the atmosphere in India is. 😍
Tune-in to #AUSvPAK in the #WorldCupOnStar
FRI, OCT 20, 12:30 PM onwards | Star Sports Network#CWC23 pic.twitter.com/ky12hy71CW— Star Sports (@StarSportsIndia) October 18, 2023
पाकिस्तानने काय केली तक्रार?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा देण्यात उशीर आणि चालू विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तानी प्रेक्षकांच्या व्हिसाच्या अनुपस्थितीविषयी आयसीसीकडे औपचारिक विरोध दाखल केला आहे. पीसीबीने 14 ऑक्टोबर, 2023 रोजी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानी संघासोबत झालेल्या व्यवहारासंबंधीही तक्रार केली आहे. मात्र, खेळाडूंची विधानं आता चर्चेत आहेत.
The Pakistan Cricket Board (PCB) has lodged another formal protest with the ICC over delays in visas for Pakistani journalists and the absence of a visa policy for Pakistan fans for the ongoing World Cup 2023.
The PCB has also filed a complaint regarding inappropriate conduct…
— PCB Media (@TheRealPCBMedia) October 17, 2023
पाकिस्तान संघाच्या पुढील सामन्याविषयी बोलायचं झालं, तर शुक्रवारी (दि. 20 ऑक्टोबर) त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (big news world cup 2023 pakistan players break silence on treatment in india babar azam shadab khan read)
हेही वाचा-
न्यूझीलंडने भारताकडून हिसकावला नंबर 1, Points Tableमध्ये टीम इंडियाची घसरण, आता ‘हा’ संघ 10व्या स्थानी
दारुण पराभवानंतर फिल्डर्सवर भडकला अफगाणी कर्णधार; म्हणाला, ‘आमचे क्षेत्ररक्षण खूपच खराब…’