पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित आठव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत उपांत्य फेरीत ब्लॅक हॉक्स व ब्लेझिंग ग्रिफिन्स या संघांनी अनुक्रमे सैनुमेरो जालन गोशॉक व इम्पेरिअल स्वान्स या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ब्लॅक हॉक्स संघाने साखळी फेरीत अपराजित राहिलेल्या सैनुमेरो जालन गोशॉक संघाचा 4-3 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. चुरशीच्या झालेल्या सामन्यात गोल्डन खुल्या दुहेरी 1मध्ये हॉक्सच्या अनिश राणे व तन्मय आगाशे यांनी गोशॉकच्या मकरंद चितळे व सिध्दार्थ निवसरकर यांचा 21-14, 21-14 असा तर, गोल्डन खुल्या दुहेरी 2गटात हॉक्सच्या प्रथम वाणी व विनीत रुकारी यांनी अमर श्रॉफ व तुषार मेंगळे यांचा 21-15, 21-14 असा पराभव करून संघाला चांगली सुरुवात करून दिली.
गोल्डन मिश्र खुल्या दुहेरीत हॉक्सच्या नैमिश पालेकर व राधिका इंगळहाळीकर यांनी मिहीर विंझे व सारा ठाकोर यांचा 21-06, 17-21, 15-10 असा पराभव करून ही आघाडी वाढवली. पिछाडीवर असलेल्या गोशॉकच्या अनिकेत सहस्त्रबुद्धे व योहान खिंवसरा यांनी सिल्व्हर खुला दुहेरी 3 गटात हॉक्सच्या निखिल कानिटकर व संजना पाटील यांचा 21-03, 21-09 असा पराभव करून ही आघाडी कमी केली.
त्यानंतर सिल्व्हर खुला दुहेरी 4मध्ये हॉक्सच्या आशुतोष सोमण व तन्मय चितळे यांना गोशॉकच्या हरीश अय्यर व समीर जालन यांनी 17-21, 21-17, 11-15 असे तर, वाईजमन खुल्या दुहेरीत हॉक्सच्या आनंद घाटे व प्रशांत पंत यांना गोशॉकच्या अविनाश दोशी व गिरीश खिंवसरा यांनी 13-21, 13-21 असे पराभुत करून संघाला बरोबरी साधून दिली. बरोबरीत सामना झाल्यामुळे टायब्रेकरमध्ये सामना खेळविण्यात आला. टायब्रेकरमध्ये हॉक्सच्या प्रथम वाणी व तन्मय आगाशे या जोडीने गोशॉकच्या सिध्दार्थ निवसरकर व मकरंद चितळे यांचा 21-19, 21-08 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात ब्लेझिंग ग्रीफिन्स संघाने इम्पेरिअल स्वान्स संघाचा 4-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. ग्रीफिन्स संघाकडून आकाश सुर्यवंशी, विक्रांत पाटील, आदित्य देशपांडे, निखिल चितळे, ईशान लागु, विमल हंसराज, राहुल पाठक, श्रीदत्त शानबाग यांनी अफलातून कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
ब्लॅक हॉक्स वि.वि.सैनुमेरो जालन गोशॉक 4-3(गोल्डन खुला दुहेरी 1: अनिश राणे/तन्मय आगाशे वि.वि.मकरंद चितळे/सिध्दार्थ निवसरकर 21-14, 21-14; गोल्डन खुला दुहेरी 2: प्रथम वाणी/विनीत रुकारी वि.वि.अमर श्रॉफ/तुषार मेंगळे 21-15, 21-14; गोल्डन मिश्र खुला दुहेरी: नैमिश पालेकर/राधिका इंगळहाळीकर वि.वि.मिहीर विंझे/सारा ठाकोर 21-06, 17-21, 15-10; सिल्व्हर खुला दुहेरी 3: निखिल कानिटकर/संजना पाटील पराभुत वि.अनिकेत सहस्त्रबुद्धे/योहान खिंवसरा 03-21, 09-21; सिल्व्हर खुला दुहेरी 4: आशुतोष सोमण/तन्मय चितळे पराभुत वि.हरीश अय्यर/समीर जालन 17-21, 21-17, 11-15; वाईजमन खुला दुहेरी: आनंद घाटे/प्रशांत पंत पराभुत वि.अविनाश दोशी/गिरीश खिंवसरा 13-21, 13-21; टायब्रेकर: प्रथम वाणी/तन्मय आगाशे वि.वि.सिध्दार्थ निवसरकर/मकरंद चितळे 21-19, 21-08); सामनावीर-नैमिश पालेकर/प्रथम वाणी;
ब्लेझिंग ग्रीफिन्स वि.वि.इम्पेरिअल स्वान्स 4-2 (गोल्डन खुला दुहेरी 1: हर्षवर्धन आपटे/ईशान भाले पराभुत वि.तेजस किंजवडेकर/यश काळे 17-21, 10-21; गोल्डन मिश्र खुला दुहेरी: करण पाटील/आरुशी पांडे पराभुत वि.अनिकेत शिंदे/दिप्ती सरदेसाई 11-21, 10-21; गोल्डन खुला दुहेरी 2: आकाश सुर्यवंशी/विक्रांत पाटील वि.वि.आदित्य काळे/अनिरुद्ध कोणकर 21-13, 21-17; सिल्व्हर खुला दुहेरी 3: आदित्य देशपांडे/निखिल चितळे वि.वि.अनिश रुईकर/विक्रम ओगळे 21-13, 21-11; सिल्व्हर खुला दुहेरी 4: ईशान लागु/विमल हंसराज वि.वि.अक्षय ओक/नेहा लागु 21-18, 21-07; वाईजमन खुला दुहेरी: राहुल पाठक/श्रीदत्त शानबाग वि.वि.सचिन जोशी/समीर सावळा 21-11, 21-18);सामनावीर-ईशान लागु/निखिल चितळे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिटनेसने नाहीतर पाकिस्तानने यामुळे गमावलायं सामना! दिग्गजांनी सांगितले खरे कारण
विराटने साध्य केलेल्या शिखराचे माजी दिग्गजाकडून कौतुक! म्हणाला, ‘तुला आणखी खेळताना…’
हार्दिकच्या ‘कडक’ कामगिरीनंतर आनंदला माजी भारतीय क्रिकेटर; ट्विट करत म्हणाला…