Harmanpreet Kaur Statement । 24 डिसेंबर हा दिवस भारतीय महिला संघासाठी ऐतिहासिक ठरला. भारतीय महिला क्रिकेट संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला एकमेव कसोटी सामन्यात 8 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. तसेच, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकत इतिहासही घडवला. या सामन्याची शिल्पकार स्नेह राणा ठरली. तिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हीदेखील भलतीच खुश झाली. तिने सामन्यानंतर मोठे विधान केले.
स्मृती मंधानाचा विजयी चौकार
या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला (Australia Women) संघाने दुसऱ्या डावात 261 धावांवर गाशा गुंडाळत भारताला विजयासाठी 75 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने 38 धावांची शानदार खेळी केली. तिने विजयी चौकार मारत भारताला सामना जिंकून दिला. विशेष म्हणजे, यावेळी स्मृतीने रिचा घोषसोबत (13) दुसऱ्या विकेटसाठी 51 धावांची अर्धशतकी भागीदारीही रचली होती. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज हिने विजयात नाबाद 12 धावांचे योगदानही दिले.
काय म्हणाली हरमनप्रीत?
कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने विजयानंतर म्हटले की, “हा विजय अनेक वर्षांपासून केलेल्या मेहनतीचा आहे. या विजयाचे श्रेय सपोर्ट स्टाफ, गोलंदाजी प्रशिक्षक आणि फलंदाजी प्रशिक्षकांना जाते. हे कठोर मेहनत आणि संयमाचे फळ आहे. आम्ही सकारात्मक क्रिकेट खेळण्याचा विचार केला, जे आम्हाला फायदेशीर ठरेल.”
Captain @ImHarmanpreet reflects on a momentous victory and has a special message for #TeamIndia fans 🤗#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/8xcRl9pytE
— BCCI Women (@BCCIWomen) December 24, 2023
‘फलंदाजी प्रशिक्षकावर विश्वास’
“आम्ही रिचाला प्रथम फलंदाजीसाठी पाठवले. कारण, आम्हाला माहिती होते की, ती कशाप्रकारे फलंदाजी करते. दुसऱ्या डावात रिचा आणि स्मृतीच्या भागीदारीने आम्हाला विजय मिळवण्यात मदत केली. आम्ही आमच्या फलंदाजी प्रशिक्षकावर विश्वास ठेवला आणि आमच्या सपोर्ट स्टाफने मला गोलंदाजी करण्यासाठी सांगितले आणि यादरम्यान मी विकेट्सही घेतल्या,” असे पुढे बोलताना हरमन म्हणाली.
संघातील खेळाडूंविषयी बोलताना ती म्हणाली की, “संघात प्रत्येक खेळाडूने आपले योगदान दिले आणि प्रत्येकजण संघात विजयासाठीच होता. आमच्या गोलंदाजी प्रशिक्षकांनी आम्हाला विकेट घेण्यासाठी सांगितले होते, पण यामुळे आम्हाला मदत मिळाली.”
हरमनचे प्रदर्शन
या सामन्यातील हरमनप्रीत कौर हिच्या प्रदर्शनाविषयी बोलायचं झालं, तर तिने भारताच्या पहिल्या डावात शून्यावर तंबूचा रस्ता पकडला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात तिने गोलंदाजी करताना 2 महत्त्वाच्या विकेट्स नावावर केल्या होत्या. तसेच, भारताच्या दुसऱ्या डावात तिला फलंदाजी करण्याची गरजच पडली नाही. (captain harmanpreet kaur record win statement after india women vs australia women only test)
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीपूर्वी टीम इंडियात परतला Virat Kohli, ‘या’ कारणामुळे घेतलेली सुटी; झाला खुलासा
Captain vs Captian: एलिसा हिलीने अडवला चेंडू; हरमनप्रीतला राग अनावर, पण पंचांचा निर्णय मात्र…