भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावत आहे. एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केल्यानंतर त्याची जागा चालवणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु रिषभ पंतने आपल्या गुरूच्या वाटेवर चालत,उत्कृष्ट फलंदाजी आणि यष्टिरक्षण करत,भारतीय संघाला अनेकदा संकटातून बाहेर काढले आहे.
त्याने २० कसोटी सामने आणि १८ वनडे सामने आपल्या कारकिर्दीतील आत्तापर्यंत खेळले आहे. पण त्याचे पहिले शतक आणि पहिले अर्धशतक केव्हा झळकावले होते, हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर पाहूया
केव्हा, कधी आणि कुठे झळकावले होते पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक?
रिषभ पंतने २०१८ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पदार्पण केले होते. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पहिले अर्धशतक, ४ ऑक्टोबर २०१८ रोजी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध लगावले होते.
त्याने २०१७ मध्ये भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. टी -२० क्रिकेटमध्ये त्याला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही. ११ ऑक्टोबर २०१८ रोजी त्याने चेन्नईमध्ये आपले पहिले अर्धशतक झळकावले होते. तसेच वनडे क्रिकेट बद्दल बोलायचं झालं तर, त्याने आपले पहिले अर्धशतक १५ डिसेंबर २०१९ रोजी, वेस्ट इंडिज संघाविरुद्ध चेन्नईमध्ये लगावले होते.
केव्हा,कधी आणि कुठे झळकावले होते पहिले शतक?
रिषभ पंत याने भारतीय संघासाठी तीनही प्रकारामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परंतु त्याला वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यात अपयश आले आहे. तो अनेकदा शतक करण्याच्या जवळ पोहोचला आहे. परंतु त्याला ते पूर्ण करता आले नाही. त्याने ७ डिसेंबर,२०१८ रोजी, ओव्हलच्या मैदानावर इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत शतक झळकावले होते. त्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ३ शतक झळकावले आहेत.
रिषभने आतपर्यंत एकूण २० कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ४५.२६ च्या सरासरीने १३५८ धावा करण्यात यश आले आहे. यात त्याने ३ शतक आणि ४ अर्धशतक झळकावले आहेत. तसेच वनडे क्रिकेटमध्ये त्याने १८ सामने खेळले आहेत. यात त्याने ३३.०६ च्या सरासरीने ५२९ धावा केल्या आहेत. यामधे त्याने ३ अर्धशतके झळकावले आहेत. यासोबतच त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-२० कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण ३३ सामने खेळले आहेत. यात त्याने ३३ सामन्यात १२३. ७ च्या सरासरीने ५२ धावा करण्यात यश आले आहे. यात त्याने २ अर्धशतकं झळकावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकेला पराभूत करत वनडे सुपर लीगच्या क्रमवारीत बांगलादेश अव्वल; तर भारतीय संघ ‘या’ स्थानी
आठवणीतील सामना: २२ वर्षापूर्वी गांगुली आणि द्रविडने रचला होता हा ‘दादा’ विक्रम
विराटची फुटबॉल किक पाहून फुटबॉलपटूचा प्रश्न, ‘एकच चलन पाठवू की हप्त्यांमध्ये पैसे चुकवणार?’