युनिवर्सल बॉस म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज ख्रिस गेल याला त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाते. गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यापैकी एक विक्रम असाही आहे, जो मोठ-मोठ्या खेळाडूलाही आपल्या नावावर करणे खूप कठीण आहे.
गेल (Chris Gayle) हा कसोटी क्रिकेटमधील एकमेव फलंदाज आहे, ज्याने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. हा विक्रम त्याने २०१२ला बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी गेल सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरला होता आणि बांग्लादेशचा सोहाग गाजी पहिले षटक गोलंदाजी करत होता. त्यावेळी कसोटी पदार्पण करणाऱ्या सोहागच्या पहिल्याच चेंडूवर गेलने शानदार षटकार मारला होता.
असे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले होते. जेव्हा कोणत्या फलंदाजाने सामन्यातील पहिल्याच चेंडूला हवेत मारत षटकार ठोकला होता. यासह गेलने तो दमदार विश्वविक्रम आपल्या नावावर केला होता. आजही गेलचा तो विश्वविक्रम कोणत्याही फलंदाजाला मोडता आलेला नाही. Chris Gayle Has Unique World Record Of Hitting Six On First Ball Of Test Match
एकीकडे गेलने सोहागच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारत पराक्रम केला होता आणि सोहागने पहिल्या डावातील ५व्या षटकात गेलला फक्त २४ धावांवर पव्हेलियनचा रस्ता दाखवला होती. गेलने सामन्यातील पहिल्या डावात १७ चेंडूंवर २ षटकार आणि २ चौकार मारत २४ धावा केल्या होत्या.
गेलने आतापर्यंत १०३ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ९८ षटकार मारेल आहेत. यासह गेल कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्यूलम हा कसोटी क्रिकेटमध्ये १०१ सामन्यात सर्वाधिक १०७ षटकार मारत अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. तर, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ९६ कसोटी सामन्यात १०० षटकार मारले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
विराट- रोहितची भक्कम भागीदारी मोडण्यासाठी ‘या’ खेळाडूने मागितली होती थेट पंचांकडे मदत
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी ही आहे आनंदाची न्यूज, आयसीसी टी२० विश्वचषकाची…
तेव्हा विराट लालू प्रसाद यादवांच्या मुलाच्या नेतृत्त्वाखाली खेळत होता, मी त्याला पाहिले…