---Advertisement---

“…जेव्हा आम्ही आणि आमच्या मिश्या पातळ असायच्या”, इरफानने युसुफला दिल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा

On: बुधवार, नोव्हेंबर 18, 2020 11:23 AM
---Advertisement---

नवी दिल्ली | माजी भारतीय आक्रमक फलंदाज युसूफ पठाण याने मंगळवारी (17 नोव्हेंबर) 38 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा लहान भाऊ आणि माजी भारतीय वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने एक जुने छायाचित्र शेअर केले आहे. हे छायाचित्र सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे.

या छायाचित्रामध्ये इरफान आणि युसूफ हे दोघेही भाऊ दिसत आहेत. इरफानच्या गळ्यात हार आहे आणि लोकं त्याचे स्वागत करत आहे. युसुफ त्याच्या मागे उभा असल्याचे दिसत आहे.

इरफानने छायाचित्र शेअर करताना लिहिले आहे की “ही त्यावेळेसची गोष्ट आहे जेव्हा आम्ही आणि आमच्या मिश्या पातळ असायच्या”. त्याने पुढे युसूफ पठाणला टॅग करत लिहिले की, “लव्ह यू लाला”

https://twitter.com/IrfanPathan/status/1328622146969452544?s=19

इरफान पठाण याची क्रिकेट कारकीर्द
इरफान पठाण याने 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. सुरुवातीच्या काळात त्याने आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला होता. इरफानने 29 कसोटी सामन्यांमध्ये 32.26 च्या सरासरीने 100 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर 120 वनडे सामन्यात 29.73 च्या सरासरीने 173 बळी घेतले आहेत.

युसूफ पठाण याची क्रिकेट कारकीर्द
युसूफ पठाण याने सन 2007 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या अंतिम सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. युसूफने भारतीय संघाकडून 57 वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 810 धावा केल्या आहेत आणि 33 बळीही घेतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

‘मी फक्त २ मिनीटं स्टेजवर होतो, मला माफ करा’ क्रिकेटरने व्यक्त केली दिलगीरी

भारताविरुद्ध होत असलेल्या वनडे मालिकेतून ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाची माघार

क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी! २०२१ मध्ये टीम इंडिया बारा महिने खेळणार क्रिकेट, जाणून घ्या वेळापत्रक

ट्रेंडिंग लेख –

अन् बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी क्रिकेट स्टेडियममध्ये साप सोडण्याचा प्लॅन केला होता…

क्रिकेटमध्ये ख्रिस गेलने १० वर्षांपूर्वी केले होते दुसरे त्रिशतक, पाहा दोनदा त्रिशतक करणारे अन्य तीन खेळाडू

आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---