पहिल्या दोन टी20 सामन्यात फ्लॉप ठरलेला विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव तिसऱ्या सामन्यात जुन्या फॉर्ममध्ये परतला. मंगळवारी (दि. 08 ऑगस्ट) पार पडलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात सूर्याच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 7 विकेट्सने सामना खिशात घातला. तसेच, मालिकेत 1-2ने पुनरागमन केले. सामन्यातील अर्धशतकामुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंदही झाली. अशी कामगिरी करणारा तो रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यानंतरचा तिसराच भारतीय बनला.
सूर्याची खेळी
वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना 159 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे भारतीय संघाला 160 धावांचे आव्हान मिळाले होते. यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरताच सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने या सामन्यात फक्त 44 चेंडूंचा सामना करताना 83 धावांचा पाऊस पाडला. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 4 षटकार आणि 10 चौकारांची बरसातही झाली. यावेळी सूर्यकुमार यादवकडे कारकीर्दीतील चौथे टी20 शतक ठोकत रोहितच्या चार शतकांची बरोबरी करण्याची संधी होती, पण तो हे शतकाला मुकला. मात्र, त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.
सूर्यकुमारचा खास विक्रम
सूर्यकुमार यादव याने सामन्यात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. सूर्याने केएल राहुल (99 षटकार) आणि कायरन पोलार्ड (99 षटकार) यांना पछाडले आहे. तो टी20 क्रिकेटमध्ये 100 षटकार मारणारा जगातील 14वा खेळाडू बनला आहे. तसेच, तो अशी कामगिरी करणारा तिसराच भारतीय फलंदाज बनला आहे. तो 100 षटकार मारणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. रोहित आणि विराटच्या नावावरही टी20त 100 षटकारांचा विक्रम आहे.
🚨 Milestone Alert 🚨
A SKY special! 👏 👏
Suryakumar Yadav completes a 𝗖𝗘𝗡𝗧𝗨𝗥𝗬 💯 of Sixes in T20Is 💪 💪
Follow the match ▶️ https://t.co/3rNZuAiOxH #TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/4YnGBC5dvO
— BCCI (@BCCI) August 8, 2023
टी20त सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय
182 षटकार- रोहित शर्मा
117 षटकार- विराट कोहली
101 षटकार- सूर्यकुमार यादव*
दीर्घ प्रतीक्षेनंतर तळपली सूर्याची बॅट
सूर्यकुमारने दीर्घ प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याला मोठी खेळी साकारता आली नव्हती. तसेच, टी20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातही त्याची बॅट शांतच होती. (cricketer suryakumar yadav make big records in ind vs wi 3rd t20 match)
वेस्ट इंडिज दौऱ्यावर सूर्याचे प्रदर्शन
19 धावा- पहिला वनडे सामना
24 धावा- दुसरा वनडे सामना
35 धावा- तिसरा वनडे सामना
21 धावा- पहिला टी20 सामना
01 धावा- दुसरा टी20 सामना
83 धावा- तिसरा टी20 सामना*
महत्त्वाच्या बातम्या-
विजयानंतर आत्मविश्वासाने फुगली पंड्याची छाती; विंडीजच्या विस्फोटक फलंदाजाला दिले खुले चॅलेंज; म्हणाला…
‘स्वार्थी कर्णधार…’, हार्दिक पंड्या तिलकपुढे बनला Selfish, संतापलेल्या चाहत्यांना आठवला धोनी