बेंगलोर | राॅयल चॅलेंजर बेंगलोर संघाचे प्रशिक्षक डेनियल विटोरी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक कोच ट्रेंट वुडहिल तसेच गोलंदाजी प्रशिक्षक अॅंड्रू मॅकडोनाल्ड यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.
गोलंदाजी मेंटाॅर अशिष नेहराच्या पदाला मात्र कोणताही धक्का लावण्यात आला नाही.
एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार केवळ विराटच्या इच्छेप्रमाणेच संघ व्यवस्थापन प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची निवड करणार आहे. नविन स्टाफची निवड ही पुढच्या महिन्यात करण्यात येणार आहे. त्यात कोहलीच्या शिफारसशिवाय कुणाचीही निवड होणार नाही.
याच वृत्तानुसार डेनियल विटोरीच्या जागी गॅरी कर्स्टन या संघाचे प्रशिक्षक बनु शकतात.
संघाची आयपीएलमधील कामगिरी चांगली होत नसल्याकारणामुळे हा निर्णय घेतला गेल्याचे बोलले जात आहे. संघात विराट कोहली आणि एबी डी व्हिलीयर्ससारखे खेळाडू असुनही ११ हंगामात संघाला एकही ट्राॅफी जिंकता आलेली नाही.
गेल्या हंगामात तर संघ ६ विजयांसह ६व्या स्थानी राहिला. २००९, २०११ आणि २०१६मध्ये संघ उपविजेता ठरला.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–दिग्गज भारतीय गोलंदाज झुलन गोस्वामीची टी२० क्रिकेटमधून निवृत्ती
–विराट कोहलीचा कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा डंका
–इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका: पृथ्वी शॉ, हनुमा विहारीचा प्रथमच टीम इंडियामध्ये समावेश