सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ढाका प्रीमियर लीग २०२१ ची जोरदार चर्चा सुरू आहे. मैदान असो किंवा मैदानाच्या बाहेर, वाद घडण्याचा प्रकार काही थांबताना दिसून येत नाहीये. नुकताच शाकिब अल हसन आणि अंपायर यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. ज्यामुळे शाकिब अल हसनला ३ सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले. अशातच आता, स्पर्धेतील अधिकाऱ्यांवर देखील हल्ला करण्यात आला आहे.
कापड मजूर आणि पोलिसांमध्ये सुरू असलेल्या वादात स्पर्धेतील अधिकाऱ्यांवर देखील हल्ला करण्यात आला आहे. सैफुद्दिन, अब्दुल्ला, अल मोतीन, तनवीर अहमद ,इमरान परवेज, सोहराब हुसेन, बराकतुल्लाह तुर्की, आदिल अहमद आणि देबब्रत पॉल हे अधिकारी या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या हल्ल्यात अधिकाऱ्यांच्या कारची देखील तोडफोड करण्यात आली आहे. तसेच ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी असे ही म्हटले की, हल्लेखोरांनी तब्बल २० मिनिट कारला अडवून धरले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तिथून पळ काढला होता.
सामना सुरू करण्यात झाला उशीर…
ही घटना झाल्यानंतर, अंपायर आणि सामनाधिकारी मैदानात पोहोचले होते. याच कारणास्तव सामना सुरू करण्यात अर्धा तास उशीर झाला होता. ढाका मेट्रोपोलीस क्रिकेट कमिटीचे चेअरमन काजी अहमद यांनी म्हटले की, ” सामना अधिकाऱ्यांनी खूप धाडस केले आणि सामना सकाळी ९:३० ला सुरू झाला.”
यापूर्वी शाकिब अल हसनमुळे ढाका प्रीमियर लीग स्पर्धा चर्चेत आली होती. तर झाले असे होते की, शाकिब अल हसन गोलंदाजी करत असताना त्याने अंपायरकडे पायचीतसाठी जोरदार मागणी केली होती. परंतु ती अंपायरने फेटाळून लावली होती. त्यामुळे शाकिब अल हसनने स्वतःवरचे नियंत्रण गमावले होते. त्याने हाताने यष्ट्या उधळून फेकल्या होत्या. तसेच यष्टीला लाथ देखील मारली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यामुळे त्याला पुढील ३ सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड संघाची या महत्त्वाच्या टी२० मालिकेसाठी घोषणा, ६ वर्षांनंतर ‘या’ खेळाडूचे झाले पुनरागमन
एकेकाळी भारतीय संघाकडून खेचून घेतली होती चॅम्पियन्स ट्रॉफी, आता पोट भरण्यासाठी धुवावी लागतेय बस
हर्षेल गिब्सने सोडलेल्या ‘त्या’ ऐतिहासिक झेलाला झाली २२ वर्ष, पाहा व्हिडिओ