यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघात खेळताना दिसून येत नाही. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१९ विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. सध्या तो क्रिकेटच्या मैदानावर फलदांजी करताना दिसून येत नसला तरीही एका नवीन भूमिकेत दिसून येत आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याद्वारे त्याने समालोचन क्षेत्रात पदार्पण केले होते. आता सध्या तो इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत समालोचन करताना दिसून येत आहे.
अशातच त्याने समालोचन करताना असे काही म्हटले, ज्यावरून क्रिकेट चाहत्यांना मुरली विजय आणि दिनेश कार्तिकच्या पत्नीची आठवण आली. त्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
दिनेश कार्तिकने समालोचन करत असताना फलंदाजाच्या बॅटबद्दल प्रतिक्रिया दित म्हटले कि, ‘अधिकतर फलंदाजांना त्यांची बॅट आवडत नाही. त्यांना दुसऱ्यांची बॅट जास्त आवडते. अर्थातच बॅट ही अगदी शेजाराच्या पत्नीसारखी असते. ती नेहमीच आपल्याला आवडत असते.’
दिनेश कार्तिकने दिलेली हि प्रतिक्रिया पाहून नेटीजन्सला जुन्या गोष्टी आठवू लागल्या आहेत. त्यांनी दिनेश कार्तिकच्या या प्रतिक्रियेला दिनेश कार्तिकची पहिली पत्नी निकिता आणि तिचा पती मुरली विजय यांच्यासोबत जोडले आहे. दिनेश कार्तिकची पहिली पत्नी आणि मुरली विजय यांचे प्रेमप्रकरण सुरु होते. त्यानंतर दिनेश कार्तिकने निकिताला काडीमोड दिला होता. काडीमोड झाल्यानंतर निकिताने मुरली विजयसोबत विवाह केला होता. (dinesh karthik made a hilarious comment during commentry between eng vs sr match)
@DineshKarthik take a bow👏🏻👏🏻 Brilliant commentary 😂😂 I can imagine @felixwhite and @gregjames applauding right now #tailendersoftheworlduniteandtakeover pic.twitter.com/SLD4kxIB2n
— Jon Moss (@Jon_Moss_) July 1, 2021
दिनेश कार्तिकने २०१५ मध्ये स्क्वाश खेळाडू दीपिका पल्लिकलसोबत दुसरा विवाह केला होता. ते दोघेही आता सुखी संसार करत आहेत. दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंड संघाने श्रीलंका संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. इंग्लंड संघाकडून सॅम करनने ५ गडी बाद केले होते. तर डेव्हिड विलीने ४ फलंदाजांना माघारी धाडले होते.
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला मिळणार नवी सलामी जोडी, मयंक-राहुल नव्हे ‘हा’ कसोटीपटू घेणार शुबमनची जागा?
टीम इंडिया नव्हे ‘हा’ संघ जिंकणार टी२० विश्वचषक; भारताच्या माजी यष्टीरक्षकाचे मोठे विधान
विराटसेनेची चिंता शिगेला; शुबमनच्या दुखापतीविषयी मोठी माहिती आली पुढे, मालिकेला मुकण्याची शक्यता