अबु धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर आयपीएल २०२०च्या पाचव्या सामन्यात दिनेश कार्तिकने एक खास विक्रम केला. तो आयपीएलमध्ये १५० सामने खेळणारा दूसरा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात त्याने हा पराक्रम केला. Dinesh Kartik Is Playing His 150th IPL Match As Wicketkeeper
कोलकाता संघाचा यष्टीरक्षक फलंदाज कार्तिकव्यतिरिक्त आयपीएलमध्ये १५० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळणारा एमएस धोनी हा एकमेव यष्टीरक्षक फलंदाज आहे. या दोघांव्यतिरिक्त पार्थिव पटेल आणि रॉबिन उथप्पा या यष्टीरक्षकांनी आयपीएलमध्ये १००पेक्षा जास्त सामने खेळले आहेत.
पार्थिवने यष्टीरक्षक म्हणून एकूण १२० सामने खेळले आहेत, तर उथप्पाने १११ सामन्यांचा आकडा गाठला आहे.
कार्तिकने त्याच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत यष्टीमागे एकूण १३१ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याने १०१ फलंदाजांना यष्टीमागे झेलबाद केले आहे. तर ३० फलंदाजांना त्याने यष्टीचीत केले आहे. शिवाय तो आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा दूसऱ्या क्रमांकाचा यष्टीरक्षक आहे.
आयपीएलमध्ये यष्टीरक्षक म्हणून १००पेक्षा जास्त सामने खेळणारे खेळाडू
एमएस धोनी- १६६ सामने
दिनेश कार्तिक- १५० सामने
पार्थिव पटेल- १२० सामने
रॉबिन उथप्पा- १११ सामने
महत्त्वाच्या बातम्या –
मैदानावरील ‘त्या’ घटनेमुळे साक्षी धोनीचा पारा चढला, सोशल मीडियावरुन केली टीका
रोहितसह आयपीएलमध्ये २०० षटकार मारणाऱ्या स्फोटक फलंदाजांची यादी
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याआधी रसलने तोडला कॅमेरा; पहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख –
१३ वर्षांपुर्वी टीम इंडियाच्या युवराजाने केले होते ‘ऑस्ट्रेलिया’ संस्थान खालसा
मुंबई-कोलकाता सामन्यामध्ये रोहित, रसलसह ‘या’ खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी
दे घुमा के! भारतीय फलंदाज गाजवतायेत आयपीएलचा १३ वा हंगाम