एवढं चांगलं खेळणाऱ्या श्रेयस अय्यरची ही इच्छा कधी पुर्ण होणार

भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरने मागील काही महिन्यात चांगली कामगिरी करत मर्यादीत षटकांच्या भारतीय संघातील स्थान पक्के केले आहे. पण अजूनही तो कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या प्रतिक्षेत आहे.

त्याने ट्विटरवर कसोटीमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. श्रेयसने चाहत्यांना ट्विटरवर प्रश्न विचारण्यास सांगितले होते. त्यामुळे एका चाहत्याने त्याला त्याच्या कसोटीमधील महत्त्वकांक्षबद्दल विचारले.

त्यावर श्रेयसने उत्तर दिले की ‘ही अंतिम इच्छा आहे. कसोटी क्रिकेट खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. कसोटीमध्येही माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या संधीची मी आतुरतेने वाट पाहत आहे.’

श्रेयसने आत्तापर्यंत १८ वनडे सामने आणि २२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. वनडेत त्याने ८ अर्धशतके आणि १ शतकासह ४९.८६ च्या सरासरीने ७४८ धावा केल्या आहेत. तर टी२०मध्ये २ अर्धशतकांसह त्याने ४१७ धावा केल्या आहेत.

ट्रेडिंग घडामोडी –

आफ्रिदीने कामच असं केलं की भज्जीला कराव लागलं कौतूक

दिलदार दादा! गरीब लोकांना गांगुली वाटणार मोफत तांदूळ

जगातील पहिली क्रिकेट टीम, जी देणार आपला अर्धा पगार कोरोना बाधितांना

You might also like