दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. या दौऱ्यात ३ वनडे आणि ३ टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएल गाजवणाऱ्या जोफ्रा आर्चर, सॅम करन आणि बेन स्टोक्स या तीन खेळाडूंना वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांना फक्त टी-20 मालिकेतच जागा देण्यात आलेली आहे.
इंग्लंडचा संघ 16 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. हे तिन्ही खेळाडू या दौऱ्यासाठी इंग्लंड संघात सामील असेल. परंतु ते तिथे केवळ टी-20 मालिकेत खेळतील. टी20 मालिकेतील पहिला सामना 27 आणि दुसरा 29 नोव्हेंबरला होणार आहे, तर तिसरा सामना 1 डिसेंबरला खेळला जाईल.
या मालिकेसाठी प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. मालिकेतील सामन्यांचे आयोजन बायो- बबलमध्ये न्यूलँड्स, केपटाऊन आणि पर्ल येथे खेळण्या येणार आहेत.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड दौऱ्यात होणारे सामने
27 नोव्हेंबर – पहिला टी-20 सामना, न्यूलेंड्स
29 नोव्हेंबर – दुसरा टी-20 सामना, बोलंड पार्क
1 डिसेंबर – तिसरा टी-20 सामना, न्यूलेंड्स
4 डिसेंबर – पहिला एकदिवसीय सामना, न्यूलेंड्स
6 डिसेंबर – दुसरा एकदिवसीय सामना, बोलंड पार्क
9 डिसेंबर – तिसरा एकदिवसीय सामना, न्यूलेंड्स
‘टी-20’ मालिके साठी इंग्लंडचा संघ
ऑयन मोर्गन (कर्णधार), मोइन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, क्रिस जॉर्डन, डेविड मलान, आदिल रशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपले, मार्क वुड
वनडे मालिकेसाठी इंग्लंडचा संघ
ऑयन मोर्गन (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, टॉम करन, लुईस ग्रेगरी, लियाम लिविंगस्टन, आदिल रशिद, जो रूट, जेसन रॉय, ऑली स्टोन, रीस टॉपले, क्रिस वोक्स, मार्क वोक्स, मार्क वुड
महत्त्वाच्या बातम्या-
-रन आऊट तर तुम्ही खूप पाहिले असतील! पण पाकिस्तानी खेळाडूंच्या ‘या’ कारनाम्याला तोड नाही
-VIDEO : षटकारांचं काय कौतुक, ‘हा’ चौकार पाहून तुम्हीच म्हणाल नाद खुळा !!
-एकेवेळी करणार होता आत्महत्या; आता करणार भारतीय फलंदाजांच्या दांड्या गुल
ट्रेंडिंग लेख-
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?