इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ १ जुलैपासून इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे खेळला जाणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाने लिसेस्टरशायर विरुद्ध खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्या डावात दिसला नाही. त्याची २५ जूनला एँटीजेन रॅपिड टेस्ट केली असता तो कोविड१९ पॉजिटिव्ह आढळला होता. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला होता, तर चाहतेही निराश झाले होते. आता भारतीय संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे रोहितने तो कसोटी सामन्यात खेळणार आहे, असे संकेत दिले आहेत.
रोहित सध्या आयसोलेशनमध्ये असून त्याने प्रथमच तेथिल फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. त्याने इन्स्टाग्रामच्या स्टोरीला टाकलेल्या या फोटोमध्ये थम्सअप केले आहे. या फोटोवरून तो लवकरच ठिक होणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तो या कसोटी सामन्यात खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होते, मात्र त्याची ही प्रगती पाहता तो या कसोटी सामन्यात खेळेल. तो खेळणार की नाही अशी चर्चा सुरू असताना त्याच्या जागी संघाचे नेतृत्व कोण करेल यांवर तर्कवितर्क लावले जात होते. नेतृत्वासाठी विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि रिषभ पंत यांची नावे समोर येत आहेत. तो संघात परतल्यावर चर्चांना पूर्णविराम लागेल.

रोहित भारतीय संघाचा कर्णधार झाल्यापासून तो प्रथमच संघाचे कसोटीमध्ये विदेशी मैदानावर नेतृत्व करणार आहे. ही मालिका भारताने जिंकली तर भारत प्रथमच इंग्लंमध्ये इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका जिंकण्याचा इतिहास रचेल.
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. मागील वर्षी झालेल्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे भारतीय संघ मायदेशी परतला होता. या मालिकेत भारत २-१ असा पुढे आहे. भारताला मालिका जिंकायची असेल तर एजबस्टन कसोटी सामना जिंकावा किंवा अनिर्णीत ठेवावा लागेल. तर इंग्लंड संघाचा मालिका बरोबरीत आणण्यासाठी हा सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल.
नुकतेच झालेल्या इंग्लड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेत इंग्लंड संघाने घरच्या मैदानावर पाहुण्या संघाला ३-० असे पराभूत करत मालिकेत वर्चस्व राखले आहे. या मालिकेत इंग्लंडच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हे पाहून भारतासाठी हा सामना जिंकणे तितके सोपे वाटत नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘म्हणून गांगुलीप्रमाणेच ९९ नंबरची जर्सी घातली’, स्वत: खेळाडूनेच दिले स्पष्टीकरण
मोठी बातमी! भारत विरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडचा अंतिम संघ ठरला, बघा नावे
IRE vs IND | थंडीत बोट काम करत नाहीत पण माइंडसेट करतो, युझवेंद्र चहलचे मोठे विधान






