भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. येत्या ४ ऑगस्टपासून ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम येथील मैदानावरील पहिल्या कसोटी सामन्याने या मालिकेचा शुभारंभ होणार आहे. तर १४ सप्टेंबर रोजी ही मालिका संपेल. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील सर्व कसोटी सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होतील.
आमने-सामने कामगिरी
आजवर भारत आणि इंग्लंड संघ तब्बल १२६ कसोटी सामन्यात आमने सामने आले आहेत. इंग्लंड संघाला यातील ४८ सामने जिंकण्यात यश आले आहे. तर भारताने केवळ २९ सामने जिंकले आहेत. उर्वरित ४९ कसोटी सामन्यांचा निकाल अनिर्णीत लागला आहे.
कसोटी अजिंक्यपदच्या दुसऱ्या पर्वातील पहिली लढत
आयसीसीद्वारा आयोजित विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील ही भारतीय संघाची पहिली कसोटी मालिका असेल. या मालिकेद्वारे भारत आणि इंग्लंड संघ ६० गुणांची कमाई करू शकतात. प्रत्येक सामना विजयानंतर विजेत्या संघाच्या खात्यात १२ गुणांची भरती होईल. सामना बरोबरीत सुटल्यास उभय संघांना प्रत्येकी ६ गुण मिळतील. तर अनिर्णीत राहिल्यास दोन्ही संघाच्या भात्यात ४ गुणांची नोंद होईल.
उभय संघात झाले आहेत हे बदल
ही ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यापुर्वी भारत आणि इंग्लंडने त्यांच्या संघांची घोषणा केली होती. मात्र आता दोन्ही संघात थोडेफार बदल झाले आहेत. भारतीय ताफ्यातील सलामीवीर शुभमन गिल, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि राखीव गोलंदाज आवेश खान दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाले आहेत. त्यांच्याजागी सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांना संघात सहभागी करण्यात आले आहे.
इंग्लंड संघात केवळ एक बदल झाला आहे. त्यांचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तो या मालिकेचा भाग नसेल. त्याच्याजागी क्रेग ओव्हरटोनला संघात स्थान देण्यात आले आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक
४ ते ८ ऑगस्ट- पहिला कसोटी सामना, नॉटिंघम (दुपारी ३.३० वाजता)
१२ ते १६ ऑगस्ट- दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स (दुपारी ३.३० वाजता)
२५ ते २९ ऑगस्ट- तिसरा कसोटी सामना, लीड्स (दुपारी ३.३० वाजता)
२ ते ६ सप्टेंबर- चौथा कसोटी सामना, केनिंग्टन ओव्हल (दुपारी ३.३० वाजता)
१० ते १४ सप्टेंबर- पाचवा कसोटी सामना, मॅनचेस्टर (दुपारी ३.३० वाजता)
भारतीय संघ
रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी,रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, रिद्धीमान साहा, अभिमन्यु ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव
राखीव खेळाडू : प्रसिद्ध कृष्णा, अरजन नगवासवाला
इंग्लंड संघ
जो रूट (कर्णधार), रॉरी बर्न्स, डोमिनिक सिब्ली, जोस बटलर, मार्क वुड, सॅम करन, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डॉमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक क्राउली, हसीब हमीद, डॅनियल लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन आणि क्रेग ओव्हरटन
महत्त्वाच्या बातम्या-
नॉटिंघमच्या खेळपट्टीचा फोटो आला पुढे; फलंदाज की गोलंदाज, पाहा कोणासाठी मदतशीर ठरेल हे मैदान?