भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तेथे इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला धावा बनवण्यात अपयश येताना दिसत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात संघाची अवस्था २७ धावांवर २ विकेट, अशी असतानाही विराट कोहली स्वस्तात तंबूत परतला. यामुळे त्याला स्वत:वरचा राग अनावर झाला.
कसोटी मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांच्या ३ डावांत विराटने केवळ ६२ धावा केल्या आहेत. त्यातही लॉर्ड्स कसोटीत सलामी जोडी स्वस्तात बाद झाल्यानंतर त्याच्याकडून कर्णधार खेळीची अपेक्षा होती. फलंदाजीला आल्यानंतर ३१ चेंडूत २० धावांची खेळी केल्यानंतर सॅम करनने जोस बटलरच्या हातून त्याला झेलबाद केले.
चांगल्या सुरुवातीनंतरही आपण लवकर बाद झाल्याने कोहली खूप रागात आला. त्याने पव्हेलिनला परतताच ड्रेसिंग रूममध्ये जाऊन हातातील ग्लोव्ह्ज काढून रागाने फेकले. अर्थातच त्याने ग्लोव्ह्ज फेकत स्वत:वरील राग व्यक्त केला.
A familiar mode of dismissal for Virat Kohli.
📹: England Cricketpic.twitter.com/jVyM5cEBWL
— The Field (@thefield_in) August 15, 2021
Can’t see you like this.#ENGvIND pic.twitter.com/SVjEBIq5Gc
— Neelabh (@CricNeelabh) August 15, 2021
विराटने त्याचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध कोलकत्त्यात केले होते. या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळाला होता. या सामन्यानंतर २० महिने झाले विराटने एकही शतक केले नाही. या २० महिन्यात त्याने १० कसोटी सामन्यांत ४०७ धावा, १५ एकदिवसीय सामन्यांत ६४९ आणि १८ टी-२० सामन्यांत ७०९ धावा केल्या आहेत. या काळात विराटची कसोटी सामन्यांतील सारासरी सर्वात कमी आहे. त्याने १० कसोटी सामन्यांत २३.९४ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. सरासरीच्या बाबतीत वाॅशिंटन सुंदर सर्वोच्च स्थानावर आहे. त्याने त्याच्या खेळलेल्या ४ सामन्यांमध्ये ६६.२५ च्या सरासरीने २६५ धावा केल्या आहेत.
मागच्या सात कसोटी सामन्यांमध्ये विराट एकही अर्धशतक करू शकला नाही. ही त्याच्या कारकीर्दीतील पाचवी वेळ आहे जेव्हा ते एकही अर्धशतक न करता एवढे जास्त कसोटी डाव खेळला आहे. विराटच्या कारकिर्दीत २०१४ मध्ये सर्वात जास्त १० डावांत एकदाही अर्धशतक करू शकला नव्हता.
कोहलीची क्रिकेटच्या तिनही प्रकारातील सरासरी ५० पेक्षा जास्त आहे. कोहलीने आजपर्यंत ९४ कसोटी सामन्यांत ७६०९ धावा केल्या आहेत. २५४ एकदिवसीय सामन्यांत त्याने ५९.०७ च्या सरासरीने १२१६९ धावा केल्या आणि ९० टी-२० सामन्यांत ५२.६५ च्या सरासरीने ३१५९ धावा केल्या आहेत. कोहलीने आजपर्यंत कसोटीत २७ शतके आणि २५ अर्धशतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
खास वेलकम! क्रिकेटच्या भाषेत पायलटने केले मुंबई इंडियन्सचे शानदार स्वागत, व्हिडिओ जिंकेल तुमचेही मन
…म्हणून भारताविरुद्ध रूटच्या बॅटमधून होतेय धावांची वर्षा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सांगितले रहस्य
“ए वतन वतन मेरे …”, मोहम्मद शमीने स्वातंत्र्यदिनी मुलीच्या डान्सचा व्हिडिओ केला शेअर