भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत त्याच्या मजेशीर स्वभावामुळे नेहमीच चर्चेत राहतो. रिषभ पंत मैदानात विरोधी गोलंदाजांवर नेहमी आक्रमक अंदाजात दिसतो. मात्र मैदानाबाहेर तो खुप निवांत आणि सर्व खेळाडूंसोबत मजा-मस्ती करताना दिसतो. इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी (१५ ऑगस्ट) भारत संघ अडचणीत दिसत होता. तरीही पंतचा निवांत अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.
ड्रेसिंग रूममध्ये निवांत बसल्याचा त्याचा फोटो सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या फोटोत तो ड्रेसिंग रूममध्ये जर्सी आणि पॅड घालून मस्त आराम करताना दिसत आहे. चाहते त्याच्या या अंदाजालाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यशाचे गुपित असल्याचे सांगत आहेत.
रिषभ पंत या फोटोत पॅड आणि जर्सी घालून त्याची फलंदाजी योण्याची वाट पाहत आहे. तो या फोटोत ड्रेसिंग रूममध्ये झोपलेला दिसत आहे. त्याच्या समोरच्या बाजुला मोहम्मद शमी बसलेला आहे. शमीसोबतच्या चाललेल्या चर्चेदरम्यान पंतच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. पंतचा हा अंदाज चाहत्यांना खूपच आवडले आहे.
Just love Rishabh Pant. pic.twitter.com/M6N5dTsGm9
— Johns. (@CricCrazyJohns) August 15, 2021
https://twitter.com/fwildecricket/status/1426939193293512711?s=20
एका चाहत्याने पंतचा हा फोटो शेयर करत लिहिले आहे की, “रिषभ पंत नेहमी खुश राहतो, नेहमी चिल करत राहतो. याच कारणामुळे तो मागच्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी होतो आहे.”
Rishabh Pant always happy, always chilling. That is why he is so successful in international cricket in recent times. #INDvENG pic.twitter.com/9YnPhHniyf
— Tanuj Singh (@ImTanujSingh) August 15, 2021
लाॅर्ड्सवरील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या संघाच्या आशा रिषभ पंतवर टिकून आहेत. सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पंतने १४ धावा केल्या होत्या. सामन्याच्या शेवटच्या दिवशी संघाला मोठी आघाडी देण्याची जबाबदारी पंतवर असणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने त्यांच्या दुसऱ्या डावात १८१ धावांवर ६ विकेट गमावल्या आहेत. भारतीय संघाने इंग्लंडवर १५४ धावांची आघाडी घेतली आहे.
सामन्याच्या पहिल्या डावात शतक ठोकणाऱ्या केएल राहुलला दुसऱ्या डावात तशी कमाल करता आली नाही. तो केवळ ५ धावा करून बाद झाला. रोहित शर्माने सुरुवात चांगली केली पण तो त्याचे मोठ्या धावसंखेत रुपांतर करू शकला नाही. कर्णधार विराट कोहलीने कठीण काळात केवळ २० धावा केल्या. चेतेश्वर पुजारा (४५ धावा) आणि अजिंक्य रहाणे (६१ धावा) या दोघाच्या जोडीने शतकी खेळी केली. अंतिम षटकात मोईन अलीने रहाणे आणि रविंद्र जडेजाला (३ धावा) बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाल्याने विराट स्वत:वर नाराज, ड्रेसिंग रूममध्ये ‘अशी’ काढली भडास
चुकीचा शॉट मारून आउट झालेल्या विराटवर चाहत्यांनी काढली भडास; केआरकेनेही ‘असे’ केले ट्रोल