आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (28 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान धरमशाला स्टेडियमवर एक आगळं-वेगळं दृश्य दिसले. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
याआधीही 2023 च्या विश्वचषकामध्ये क्रिकेट चाहत्यांनी अनेक घोषणा दिल्या आहेत. यापूर्वी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान क्रिकेट भारतीय चाहत्यांनी ‘जय श्री राम’चा नारा दिला होता. याशिवाय भारतीय प्रेक्षकांनी पाकिस्तानी खेळाडूंना चिडवलं देखील होतं. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे तक्रार केली होती.
https://twitter.com/ImTanujSingh/status/1718216779565244570?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1718216779565244570%7Ctwgr%5Ea2b70753ff9935ea8d2c605acd6a2473af9ca5ff%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-australian-fans-raised-slogans-of-bharat-mata-ki-jai-and-vande-mataram-during-match-against-new-zealand-video-going-viral-8901373.html
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात ऑस्ट्रेलियन चाहते ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देत असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामना नेहमीच हाय व्होल्टेजचा असतो. या सामन्यात ट्रेविस हेडच्या स्फोटक शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 49.2 षटकांत सर्वबाद 388 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून विश्वचषकातील आपला पहिला सामना खेळणारा ट्रेविस हेड (Travis Head) याने सर्वाधिक 109 धावा केल्या, या खेळीत त्याने 7 षटकार आणि 10 चौकार ठोकले. तर न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट (Trent Boult) याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
या मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला चांगली सुरूवात मिळाली. न्यूझीलंड संघाला आठव्या षटकात संघाची धावसंख्या 61 असताना डेवाॅन काॅन्वे याच्या रूपात पहिला झटका लागला. या सामन्यात न्यूझीलंडकडून रचिन रविंद्र (Rachin Ravindra) याने सर्वाधिक 116 धावांची शतकी खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पा (Adam Zampa) याने 74 धावात सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. (Even the Australian fans could not hide their love for India what exactly happened watch the video)
म्हत्वाच्या बातम्या
नेदरलँड्सचा कॅप्टन ऍडवर्ड्स ‘या’ बाबतीत सर्वात भारी! बांगलादेशविरुद्ध केला मोठा विक्रम
थरारक सामन्यात ऑस्ट्रेलिया 5 धावांनी विजयी, 389 चा पाठलाग करताना रचिन-निशामची झुंज अपयशी