दक्षिण आफ्रिका संघ लवकरच वेस्ट इंडिज संघासोबत कसोटी आणि टी -२० मालिकेत आमने सामने येणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने, मंगळवारी (१८ मे ) संघाची घोषणा केली आहे. परंतु या संघात दिग्गज खेळाडूला वगळण्यात आले आहे. जे पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत.
आयपीएल २०२१ स्पर्धेत, आपल्या तुफान फटकेबाजीने, चेन्नई सुपर किंग्ज संघाची गाडी रुळावर आणणाऱ्या फाफ डू प्लेसिसला या संघात स्थान देण्यात आले नाही. त्याला संघात स्थान का देण्यात आले नाही याबद्दल, कुठलेही स्पष्टीकरण दिले गेेले नाही.
आयपीएल २०२१ स्पर्धेत त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना ७ सामन्यात ६४ च्या सरासरीने आणि १४५ च्या स्ट्राईक रेटने ३२० धावा ठोकल्या होत्या. यापैकी ४ सामन्यात त्याला अर्धशतक झळकावण्यात यश आले होते. यासोबतच त्याने १३ षटकार देखील लगावले. अशी उल्लेखनीय कामगिरी केली असताना देखील त्याला राष्ट्रीय संघात स्थान न मिळाल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य झाले आहे. तसेच एबी डिविलियर्सने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास नकार दिला आहे.
फाफ डू प्लेसिसने यावर्षाच्या सुरुवातीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण तो मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळत राहाणार असल्याचे त्याने सांगितले होते.
🔹 Prenelan Subrayen receives maiden 🇿🇦 call-up
🔹 Lizaad Williams earns maiden Test call-upSouth Africa have announced their Test and T20I squads for the West Indies series 👇 pic.twitter.com/HVgFsx7IQS
— ICC (@ICC) May 18, 2021
कसोटी मालिकेसाठी असा आहे दक्षिण आफ्रिका संघ
डीन एल्गार (कर्णधार), टेंबा बावुमा, क्विंटन डीकॉक, सरेल एरवी, ब्यूरॉन हेन्ड्रीक्स, जॉर्ज लिंड, केशव महाराज, एडेन मार्करम, वियान मुल्डर, लुंगी एन्गिडी, एन्रिच नॉर्किए, कीगन पीटरसन, मार्को जेन्सन, कगिसो रबाडा, तब्राईज शम्सी, प्रेनेलान सुब्रयन, रस्सी वॅन डर ड्यूसेन, कायल वेरियेने आणि लिजाज विलियम्स.
टी-२० मालिकेसाठी असा आहे दक्षिण आफ्रिका संघ :
टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डीकॉक, जॉर्न फॉर्टुइन, रीजा हेन्ड्रीक्स, हेनरिक क्लासेन, जॉर्ज लिंड, सिसांदा मगाला, यानेमन मलान, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एन्रिच नॉर्किए, कगिसो रबाडा, ताब्राईज शम्सी, रस्सी वॅन डर ड्यूसेन, कायल वेरियेने, लिजाज विलियम्स, एंडिल फेहलुक्वायो आणि ड्वेन प्रीटोरियस.
महत्त्वाच्या बातम्या –
‘युनिव्हर्स बॉस’ची बातच न्यारी! गेलने चक्क समुद्रात मारले पुशअप्स, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
न्यूझीलंडच्या नील वॅगनरनचा सराव होण्यासाठी ‘हा’ युवा गोलंदाज करणार भारतीय संघाला मदत