कसोटी आणि वनडे मालिकेनंतर आता भारतीय संघ टी20 मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध भिडणार आहे. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली भारताची युवा ब्रिगेड गुरुवारी (दि. 03 ऑगस्ट) पहिल्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध भिडणार आहे. या सामन्यात यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा यांसारख्या खेळाडूंकडे छाप सोडण्याची सुवर्णसंधी आहे. तसेच, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक हेदेखील गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करू शकतात. या लेखातून आपण त्या 5 भारतीय खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत, जे पहिल्या सामन्यात शानदार प्रदर्शन करून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांच्या नांग्या ठेचू शकतात.
‘या’ 5 भारतीय खेळाडूंवर असतील नजरा
1. यशस्वी जयसवाल
यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत छाप सोडली आहे. त्याने पदार्पणाच्या कसोटीत शतक ठोकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर आता तो टी20 मालिकेतही दम दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. टी20 क्रिकेट प्रकारात जयसवालची बॅट चांगलीच तळपते. त्याने आयपीएलमध्ये जगातील दिग्गज गोलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले आहे. अशात पहिल्या टी20 सामन्यात जयसवाल यजमान गोलंदाजांना त्रास देताना दिसू शकतो.
2. सूर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्यासाठी वनडे मालिका खास ठरली नाही. मात्र, टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार जबरदस्त फलंदाजी करतो. अशात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्याच्यावर भारतीय संघाची जबाबदारी असेल.
3. ईशान किशन
वनडे मालिकेत सलग तीन अर्धशतक करणारा ईशान किशन (Ishan Kishan) हा वेस्ट इंडिजसाठी मोठा धोका असेल. ईशानच्या बॅटमधून सध्या धावांचा पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे, वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंत त्याने वनडे क्रिकेट प्रकारात शानदार प्रदर्शन केले आहे. अशात पहिल्या टी20 सामन्यातही ईशान किशन हार्दिक पंड्यासाठी सर्वात मोठा ट्रम्प कार्ड ठरू शकतो.
4. हार्दिक पंड्या
पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. पहिल्या टी20 मालिकेत सर्वांच्या नजरा पंड्यावर असतील. तो बॅट आणि चेंडू दोन्हीमधून चांगले योगदान देऊ शकतो. वनडे मालिकेच्या अखेरच्या सामन्यात पंड्याने जबरदस्त फलंदाजी करत 52 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 70 धावांचा पाऊस पाडला होता. तसेच, गोलंदाजीतही त्याने मागील काही काळापासून या क्रिकेट प्रकारात चांगली कामगिरी केली आहे.
5. कुलदीप यादव
वनडे मालिकेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना घाम फोडणारा फिरकी गोलंदाज म्हणजे कुलदीप यादव (Kuldeep Yadav) होय. आता तो टी20तही फलंदाजांना त्रास देण्यासाठी तयार असेल. कुलदीपने वनडे मालिकेत शानदार प्रदर्शन करत 3 सामन्यात 7 विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे, वेस्ट इंडिजचे फलंदाज कुलदीपचा चेंडू खेळण्यात अपयशी ठरले होते. (five indian players to watch out in 1st t20i match against ind vs wi see list)
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा Insta DMमध्ये ब्रायन लाराचा मेसेज पाहून दंग झालेला ईशान, दिग्गजापुढेच सांगितला भावूक किस्सा
मालिका विजयासह Team Indiaचा वेस्ट इंडिजविरुद्ध विश्वविक्रम, प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान