भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला काही महिन्यांपूर्वी खराब कामगिरीमुळे टीकेला सामोरे जावे लागत होते. त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला भारतीय संघाच्या अंतिम ११ जणांमधील जागाही गमवावी लागली. पण माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने म्हटले आहे की पंतकडे खूप प्रतिभा आहे. पण त्याला सर्वोत्कृष्ट बनण्यासाठी मनोवैज्ञानिकाची आवश्यकता आहे.
माजी फिरकीपटू हॉग यांना ट्विटरवर एका चाहत्याने पंतबद्दल प्रश्न विचारला होता. त्याने विचारले होते की ‘तूमचे पंतबद्दल काय विचार आहेत? तो सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज बनू शकतो का?’
यावर उत्तर देताना हॉग यांनी सांगितले, ‘रिषभ पंत जेव्हा मैदानात येतो तेव्हा मी माझा टीव्ही चालू करतो. त्याला पहाणे मनोरंजक आहे. पण त्याची समस्या ही आहे की त्याला त्याच्याकडे असेलेल्या प्रचंड प्रतिभेचे काय करायचे हे माहित नाही. तो मनोवैज्ञानिकाची मदत घेऊ शकतो. अनेक महान खेळाडूंना असे केले आहे.’
भारतीय संघाने मर्यादीत षटकांच्या मागील काही क्रिकेट सामन्यांसाठी केएल राहुलला रिषभ पंत ऐवजी यष्टीरक्षणाची जबाबदारी दिली होती. तर कसोटीमध्ये पंतसह वृद्धिमान साहा हा देखील यष्टीरक्षक म्हणून पर्याय भारताकडे आहे.
ट्रेडिंग घडामोडी –
वनडे आणि कसोटीत असा पराक्रम करणारा सेहवाग जगातील एकमेव खेळाडू
विराट की धोनी? भारी कोण? शाहिद कपूरने घेतले हे नाव
एवढं चांगलं खेळणाऱ्या श्रेयस अय्यरची ही इच्छा कधी पुर्ण होणार
आफ्रिदीने कामच असं केलं की भज्जीला कराव लागलं कौतूक