ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सध्या अत्यंत वाईट काळातून जात आहे. त्याची कामगिरी त्याच्या खेळाला साजेशी अशी होत नाही. तसेच क्रिकेटच्या बाहेर देखील तो सातत्याने वादात अडकलेला दिसत आहे. अशातच आता तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करू शकतो, अशी शक्यता ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात तो सपशेल अपयशी ठरला. दोन्ही डावांत मिळून त्याला केवळ 3 धावा करता आल्या. मात्र, असे असतानाही ऑस्ट्रेलियाने 2 दिवसांतच हा सामना 6 गडी राखून जिंकला. वॉर्नरच्या बॅटमधून शेवटचे कसोटी शतक जानेवारी 2020 मध्ये आले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील 4 डावात 5, 48, 21 व 28 धावा केल्या होत्या.
त्याच्या याच खराब कामगिरीवर बोलताना ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू सायमन ओडोनील याने एका कार्यक्रमात बोलताना म्हटले,
“प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, सध्या कसोटी क्रिकेटमध्ये वॉर्नरची ती कामगिरी होत नाही यासाठी तो ओळखला जातो. केवळ आत्ताच नाही तर मागील दोन वर्षातील त्याची आकडेवारी तरी तशीच सांगते. मला वाटते तो स्वतःच सध्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार करत असेल. सिडनी येथील शेवटच्या कसोटीनंतर त्याने हा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटायला नको.”
डेव्हिड वॉर्नर याची वैयक्तिक कामगिरी खराब होत असतानाच क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी देखील त्याचे संबंध बिघडल्याचे दिसत आहेत. बॉल टेम्परिंग प्रकरणामुळे त्याच्यावर कायमस्वरूपी कर्णधारपदाची बंदी घालण्यात आली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नियमात बदल केल्यानंतरही त्याला पुन्हा ही संधी मिळाली नाही. त्यानंतर त्याने थेट इंस्टाग्राम पोस्ट करत बोर्डावर आरोप लावले होते.
(Former Australian Allrounder Said Warmer Thinking About Test Retirement)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फुटबॉलचा नवा राजकुमार! हॅट्रिक मारत अर्जेंटिनाच अवसान घालवलेला बाजीगर एम्बाप्पे
लेकाने विश्वचषक जिंकताच थेट मैदानात धावली आई, आनंदाच्या भरात मेस्सीला मारली मिठी