fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कोणाला घर हवं आहे का? स्टिव्ह स्मिथ देतोय भाड्याने घर…

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) सिडनी (Sydney) येथील आपले आलिशान घर भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे.

स्मिथचे हे घर सिडनीचे उपनगर बामलिनमध्ये आहे. रियलस्टेट डॉट एयूच्या माहितीप्रमाणे या घराचे भाडे 2000 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 95000 रुपये प्रति आठवडा इतके आहे. या घराचे भाडे, 2018 मध्ये स्टिव्ह स्मिथ ज्या किंमतीत मागत होता त्यापेक्षा कमी आहे. या घराचे वैशिष्ट्ये म्हणजे या घराच्या खिडकीतून सिडनी हार्बर ब्रिजचा नजारा दिसतो. हे घर स्मिथच्या अनेक मालमत्तांपैकी एक आहे.

3 बेडरूम आणि बाथरूम असेलले हे घर स्मिथने 2015मध्ये 20 लाख डॉलरमध्ये विकत घेतले होते. तसेच त्यानंतर आर्किटेकने घर पुन्हा तयार केले आहे आणि त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. घरामध्ये काळ्या रंगाची सजावट तसेच ओपन किचन आणि डायनिंग एरिया आहे. या घरात काळ्या रंगाचा वापर चांगल्याप्रकारे करण्यात आला आहे. यामध्ये लाकडी कामदेखील शानदार आहे.

स्मिथ आणि त्याची पत्नी डॅनी विल्स सध्या 2011 मध्ये विकत घेतलेल्या दुसऱ्या घरात राहतात. हे घर समुद्र किनाऱ्याजवळ आहे.

स्मिथ 2018मध्ये चेंडू छेडछाडप्रकरणी वादात अडकला होता. यानंतर स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला प्रत्येकी एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. यानंतर स्मिथने मागीवर्षी ऍशेस मालिकेत दमदार पुनरागमन करत 774 धावा केल्या होत्या.

You might also like