आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयोजित केलेल्या स्पर्धा म्हणजे क्रिकेटरसिकांसाठी पर्वणीच असते. कारण जगभरतील मोठमोठे संघ या स्पर्धेत सहभागी होत असतात. प्रत्येक क्रिकेट संघसुद्धा आयसीसी चषक जिंकण्यासाठी आपले सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करतो. मात्र बऱ्याचदा अंतिम फेरी गाठूनही काहींच्या पदरीच निराशाच येते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला तर आतापर्यंत अनेकदा या दुर्देवी स्थितीचा सामना करावा लागला आहे.
चँपियन्स ट्रॉफी (२०१७), वनडे विश्वचषक (२०१९) आणि नुकतीच कसोटी चँपियनशीप (२०२१) त्याने गमावली आहे. यानंतर क्रिकेट पंडितांपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनी त्याला नेतृत्त्वपदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आता माजी भारतीय क्रिकेटपटू आणि विराटचा माजी संघसहकारी सुरेश रैना याने मोठे वक्तव्य केले आहे.
‘न्यूज २४ स्पोर्ट्स’शी बोलताना रैना म्हणाला की, “माझे मते विराट हा अव्वल क्रमांकाचा कर्णधार आहे. त्याची कामगिरी त्याने साध्य केलेल्या यशाची ग्वाही देते. तो फलंदाजीच्या बाबतीतही सर्वोत्कृष्ट आहे. पण क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यात तो खूप मागे आहे. तुम्ही सर्वजण त्याच्या आयसीसी ट्रॉफींविषयी बोलत आहात, पण त्याला आतापर्यंत साधे आयपीएल चषकही जिंकता आले नाही.”
“मला वाटते की, आपण सर्वांनी विराटला थोडा वेळ द्यायला हवा. येत्या काही दिवसांत एकापाठोपाठ एक २-३ विश्वचषक होणार आहेत, २ टी२० विश्वचषक आणि एक ५० षटकांचा वनडे विश्वचषक. कोणत्याही क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठणे सोपे नसते. परंतु विराटने ते केले आहे. कधी-कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यामुळे त्याला संधी देऊन पाहाणे गरजेचे आहे. येत्या १२-१६ महिन्यात भारताच्या खात्यात अजून एका आयसीसी चषकाची नक्कीच भर पडेल,” असेही तो म्हणाला.
थोडक्यात सांगायचे झाल्यास रैनाने विराटला जेतेपद जिंकता न आल्याने त्याला टोमणा मारला आहे. परंतु त्याने लवकरच विराटच्या नेतृत्त्वाखाली आयसीसी स्पर्धा जिंकण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानने लढवली शक्कल, विश्वचषक आयोजनासाठी ‘या’ दोन देशांशी मिळवला हात
सहा महिन्यांची झाली वामिका, डॅडी विराटच्या कुशीत दिसली खेळताना; अनुष्काने दाखवली झलक
पृथ्वी शॉने संघातील वरिष्ठ गोलंदाजांची केली जोरदार धुलाई, सलामीसाठी दर्शवली दावेदारी