आयसीसी विश्वचषक स्पर्धा ही क्रिकेटविश्वातील सर्वात मोठी आणि मानाची स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेचे आयोजन आपल्याच देशात व्हावे अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यामुळे या मोठ्या स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी क्रिकेट बोर्ड सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. अशातच पाकिस्तानने देखील विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी नवीन मार्ग शोधून काढला आहे.
विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळावे अशी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची इच्छा आहे. असे म्हटले जात आहे की, संयुक्त यजमानपद मिळवण्याकरिता पाकिस्तान क्रिकेट बोर्डने बांगलादेश आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डासोबत हात मिळवला आहे.(Pakistan shake hands with Bangladesh and Srilanka boards for hosting two icc world cups)
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी देखील व्यक्त केली दावेदारी
या व्यतिरिक्त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अमीरात क्रिकेट बोर्डासोबत मिळवून एका समूहाची स्थापना करणार आहे. हे दोन्ही बोर्ड मिळून २०२४ पासून ते २०३१ पर्यंत होणाऱ्या २ आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.
संयुक्त यजमानपद मिळवण्याचा करणार प्रयत्न
क्रिकबजच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची अशी इच्छा आहे की त्यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड सोबत मिळून २०२७ आणि आणि २०३१ मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचे संयुक्त यजमानपद मिळवावे.
चॅम्पियन्स ट्रॉफीवरही पाकिस्तानचा डोळा
केवळ टी-२० आणि वनडे विश्वचषक नव्हे तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा चॅम्पियन्स ट्रॉफीवरही डोळा आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड २०२५ आणि २०२९ मध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे एकहाती आयोजन करण्यासाठी उत्सुक आहे.
यजमानपद मिळवण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरूच
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला १९९६ नंतर एकदाही आयसीसीच्या स्पर्धांचे यजमानपद मिळालेले नाही. त्यामुळे यजमानपद मिळवण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. २०११ विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला संयुक्त यजमानपद मिळाले होते. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव हे सामने दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले होते.
१७ देशांनी यजमानपद मिळवण्यासाठी सादर केला प्रस्ताव
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय व्यतिरिक्त आणखी १५ देशांनी आयसीची स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, मलेशिया, नांबिया, न्यूझीलंड, ओमान, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज, युएई, युएसए आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉने संघातील वरिष्ठ गोलंदाजांची केली जोरदार धुलाई, सलामीसाठी दर्शवली दावेदारी
अर्जेंटिनाने जेतेपद पटकावल्याने मुलगा कपडे काढून करू लागला डान्स, वडिलांनी खुर्चीने दिला चोप
दिप्तीने चेंडूला हातही न लावता इंग्लंडच्या कर्णधाराला केले धावबाद; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘गजब!’