भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. मागील महिन्यात २७ फेब्रुवारी रोजी त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मुंबईच्या वांद्रे येथे विनोद कांबळीने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना एका गाडीला टक्कर मारली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र, त्यानंतर कांबळीला जामीनही मिळाला होता. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत भारताचा माजी खेळाडू विनोद कांबळीची अवस्था खूपच वाईट असल्याचे दिसत आहे. त्याने खूपच जास्त दारूच्या नशेत त्याला व्यवस्थित चालताही येत नाहीये. दारूच्या नशेत तो धडपडत चालत आहे. महत्त्वाचं म्हणजे, त्याच्याकडून स्वत:चाच तोल सावरला जात नाहीये. या अवस्थेत तो गेटमधून बाहेर चालत येतो आणि रस्त्यावरील एका कारला धडकतो. या अवस्थेत त्याला कारचालक आणि तेथील लोक सावरतात, पण तो त्यांच्याशीच वाद घालताना दिसत आहे.
दारुच्या नशेत विनोद कांबळीची कारला धडक आणि कारमालकाशी वाद#VinodKambli
WC : Whatsapp pic.twitter.com/o2JixqZFfW— अक्षय चोरगे (Akshay Chorge) (@AkshayChorge1) March 2, 2022
या प्रकरणावरून आता पोलिसांनी विनोद कांबळीवर कायदेशीर कारवाई केली आहे. कलम ७९ आणि कलम ३३६ (वैयक्तिक सुरक्षा धोक्यात घालणे) आणि कलम ४२७ (नुकसान पोहोचवणे) अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
सायबर गुन्ह्याचाही झाला होता शिकार
नुकत्याच काही काळापूर्वी विनोद कांबळी चर्चेत आला होता. तो एका सायबर गुन्ह्याचा शिकार झाला होता. केव्हायसी अपडेटच्या नावाखाली एका व्यक्तीने स्वत:ला बँक कर्मचारी सांगत कांबळीला सव्वा लाखांचा गंडा घातला होता. त्यानंतर कांबळीने या प्रकरणाचा गुन्हा वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला होता. सायबर टीमने यावर ऍक्शन घेतली होती. त्यानंतर कांबळीला त्याची रक्कम पुन्हा मिळाली होती.
विनोद कांबळीची कारकीर्द
विनोद कांबळीने भारतासाठी १०७ वनडे सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३२.५९ च्या सरासरीने २४७७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर २ शतके आणि १४ अर्धशतके आहेत. दुसरीकडे १७ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ५४.२० च्या सरासरीने १०८४ धावा केल्या, ज्यात ४ शतकांचा समावेश आहे. त्याने भारतीय संघासाठी शेवटचा सामना २९ ऑक्टोबर, २००० रोजी खेळला होता.
त्याच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने तिथेही चांगली कामगिरी केली आहे. त्याने १२९ प्रथम श्रेणी सामने खेळताना ५९.६७ च्या सरासरीने ९९६५ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ३५ शतके आणि ४४ अर्धशतके ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
विनोद कांबळीचा ‘टाईट’ असतानाचा व्हिडिओ व्हायरल, गाडी ठोकल्यामुळे झालेली अटक
कोरोना संक्रमित राउफच्या जागी ‘या’ हॅट्रिकवीराची पाकिस्तानच्या कसोटी संघात वर्णी, करणार पुनरागमन