क्रिकेटमध्ये सामना फिक्सिंगसारखी मोठी चूक करत आपले आयुष्य उध्वस्त करून घेणारे बरेच खेळाडू होऊन गेले. यातील ज्या खेळाडूंचे आरोप सिद्ध झाले , त्या खेळाडूंवर आजीवन बंदी घालण्यात आली. पण, असा एक खेळाडू आहे, ज्याने स्पॉट फिक्सिंगमुळे क्रिकेटमधून निलंबित झाल्यानंतर सिनेसृष्टीत आपला हात आजमावला. आता तो लवकरच बॉलिवूडमध्येही धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. हा क्रिकेटपटू अजून कोण नसून, भारताचा वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीसंत आहे.
श्रीसंतने यापुर्वी बऱ्याचशा तमिळ चित्रपटात काम केले आहे. परंतु हिदी चित्रपटात काम करण्याची, तिही मुख्य भूमिकेत असण्याची संधी त्याला फारसी मिळाली नाही. मात्र लवकरच तो हिंदी चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या नवीन चित्रपटाचे नाव ‘पट्टा’ असून तो हिंदी भाषेतील चित्रपट आहे. ३८ वर्षीय श्रीसंत या चित्रपटात सीबीआय अधिकारीच्या रुपात असेल.
हा चित्रपट ‘एनएनजी फिल्म ग्रुप’चा असून या चित्रपटाचे निर्माते निरूप गुप्ता आहेत. या चित्रपटात धमाल गाणे असून हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरू शकतो. श्रीसंतचा हा पाचवा चित्रपट असेल.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज श्रीसंतने आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासून क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने भारतीय संघाचे एकवेळा टी-२० विश्वचषक आणि एकवेळा एकदिवसीय विश्वचषकात प्रतिनिधित्व केले आहे. दोन्ही विश्वचषकात श्रीसंतची भरीव कामगिरी राहिली.
२०१३ साली श्रीसंतने आयपीएल सामन्यात बुकीशी संपर्क साधून सामन्यात फिक्सिंग केली. त्यामुळे त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. म्हणून श्रीसंत गेली ५ वर्ष क्रिकेटपासून लांब होता. मात्र, गतवर्षी त्याच्यावरील बंदी हटवण्यात आली आणि त्याने मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी खेळण्याची परवानगीही दिली गेली होती. या दोन्ही स्पर्धेत श्रीसंतने बऱ्यापैकी कामगिरी केली. परंतु, श्रीसंतला यंदाच्या आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने बोली लावली नाही.
श्रीसंतने आजवर भारतीय संघासाठी २७ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने ८७ विकेट्स काढल्या आहेत. ५३ एकदिवसीय सामन्यात ७५ विकेट्स आणि १० टी-२० सामन्यात ७ विकेट्सची कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
WTC Final, INDvsNZ Live: संपूर्ण चौथ्या दिवसावर पावसाचे सावट; खेळ सुरु होण्यास उशीर
‘पुजारामुळे नॉन स्ट्राईकवरील फलंदाजाला बाद होण्याचा धोका’; पाहा कुणी केलंय हे वक्तव्य?
बुमराहच्या सुमार कामगिरीमुळे पत्नी संजनावर नेटकऱ्यांनी साधला निशाणा, उमटल्या ‘अशा’ प्रतिक्रिया