ऑस्ट्रेलिया दौर्यावर असलेला भारतीय संघ वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत पराभूत झाला. यासह ३ सामन्यांची मालिका देखील भारतीय संघाने गमावली. ऑस्ट्रेलियन संघाने तिन्ही आघाड्यांवर भारतीय संघाला चितपट केले.
भारतीय संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण गोलंदाजांचे अपयश असल्याचा सूर सर्वत्र उमटतो आहे. दोन्ही सामन्यांत ३५० हून अधिक धावा देणार्या भारतीय गोलंदाजांची लय हरवल्याचे दिसत होते. अशातच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वैतागून फिल्डींग मार्कला लाथ मारत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मैदानावर पहिल्यांदाच चिडलेला दिसला बुमराह
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सहसा मैदानावर आपल्या भावनांच प्रदर्शन करताना दिसत नाही. मात्र, यावेळी पहिल्यांदाच बुमराह मैदानावर वैतागलेला दिसला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी करत असताना बुमराहला बळी मिळत नव्हते. तसेच त्याच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन फलंदाज धावा देखील सहजतेने लुटत होते. कदाचित याच कारणाने चिडलेला बुमराह ३० यार्डावरील मार्कला लाथ मारताना दिसून आला.
A very frustrated Jasprit Bumrah has now kicked two of the 30-yard fielding markers away with great angst. Not a good look this #ausvind @cricbuzz pic.twitter.com/ZbPSJEYJSe
— Bharat Sundaresan (@beastieboy07) November 29, 2020
वनडे मालिकेत बुमराहची खराब कामगिरी
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना बुमराहने दमदार गोलंदाजी केली होती. हाच फॉर्म तो भारतीय संघाकडून कायम राखेल अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, बुमराह ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर संघर्ष करताना आढळला. या मालिकेत बुमराहने २० षटकांत १५२ धावा देताना केवळ २ बळी घेतले. भारतीय संघाला या दौर्यावर पुनरागमन करायचे असल्यास बुमराहला पुन्हा लय गवसणे, गरजेचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट
…तर तुम्हाला देशाबाहेर काढू! न्यूझीलंडने दिली पाकिस्तानी संघाला ‘लास्ट वॉर्निंग’
परदेशातील सलग दुसरा ‘क्लीन स्वीप’ वाचवण्यासाठी टीम इंडिया देणार ऑस्ट्रेलियाला टक्कर
ट्रेंडिंग लेख-
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज