कोरोना व्हायरस या जागतिक साथीच्या रोगाने जगात खळबळ उडवली आहे. याचा सर्वात मोठा फटका क्रीडा क्षेत्राला बसला आहे. जगातील जवळपास सर्वच खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्थरापासून लोकल स्थरापर्यंत सर्वच मालिका रद्द झाल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या आहेत.
क्रिकेट क्षेत्रही याला अपवाद राहिलेले नाही. आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत तसेच खाजगी क्रिकेट लीग यामुळे एकतर रद्द कराव्या लागल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर काय आहे स्थिती-
मार्च महिन्यात क्रिकेटच्या अनेक द्विपक्षीय मालिका होणार होत्या. त्या आता पुर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. याचा फटका भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, श्रीलंका विरुद्ध इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेला बसला. यामुळे आता थेट 2 एप्रिल 2020 रोजी आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे टी20 मालिकेने सुरुवात होणार आहे.
देशांतर्गत क्रिकेटची स्थिती-
भारत तसेच ऑस्ट्रेलियाने देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व मालिकांना पुढील काही दिवसांसाठी स्थगिती दिली आहे. भारतातील इराणी तसेच दुलीप ट्राॅफाचे सर्व सामने पुढे ढकलले आहे.
क्रिकेट लीगची स्थिती-
सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग सुरु आहे. ती 18 मार्च रोजी संपणार आहे. आयपीएल तर यापुर्वीच 15 एप्रिलपर्यंत स्थगित केली आहे. आता इंग्लंडची टी20 ब्लास्ट लीग 28मे पासून सुरु होईल.
महिलांचे आंतरराष्ट्रीय सामने-
महिलांचे सर्व सामने आता थेट जून महिन्यात सुरु होणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिकेला 25 जूनला सुरु होणार आहे.