भारतीय क्रिकेट संघाचा आणि आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या प्रदर्शनामुळे किंवा इतर कोणत्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतो. पण सध्या विराटची पत्नी अनुष्का शर्मा जोरदार चर्चेत आहे.
कारण गुगल या ऍपवर अफगानिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानची पत्नी, असे शोधल्यानंतर तिथे अनुष्काचे नाव येत आहे. त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला आहे की, नक्की गुगलवर अशी चुकीची माहिती का दिसत आहे?. चला तर जाणून घेऊया…
झाले असे की, २०१८ साली इंस्टाग्रामवरील एका गप्पा सत्रात राशिदला प्रश्न विचारण्यात आला होता की, त्याची आवडती बॉलिवूड अभिनेत्री कोण आहे?. यावर उत्तर देताना राशिदने अनुष्का आणि प्रिती झिंटाचे नाव घेतले होते. त्यामुळे सोशल मीडियावर राशिद आणि अनुष्काची जोरदार चर्चा होऊ लागली होती. तेव्हापासून गूगलवर राशिदची पत्नी असे सर्च केल्यानंतर अनुष्काचे नाव येऊ लागले.
महत्त्वाचे म्हणजे, राशिदचे अजूनही लग्न झालेले नाही. जुलै २०२०मध्ये एका मुलाखतीत बोलताना राशिदने स्वत: या गोष्टीची पुष्टी केली होती. तर दूसऱ्या बाजूला, ११ डिसेंबर २०१७ रोजी अनुष्काचे विराटसोबत लग्न झाले होते. एवढेच नाही तर, अनुष्का सध्या प्रेगनेन्ट आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एका भारतीयासह जगातील दिग्गज क्रिकेट संघ पाकिस्तानात होणार क्वारंटाईन?
अय्यर-धवनसारखे फलंदाज असूनही का मुंबईविरुद्ध दिल्ली हारली, कृणालने सांगितले कारण
चेन्नई सुपर किंग्ज संघातील दुसरा धोनी? जाणून घ्या कोण आहे ‘तो’ खेळाडू
ट्रेंडिंग लेख-
‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
IPL 2020: दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्यात रोहितसह ‘हे’ खेळाडू करु शकतात खास विक्रम
‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?