इंडियन प्रीमियर लीग, या जगप्रसिद्ध टी२० लीगमध्ये खेळाडू त्यांच्या प्रदर्शनाचा ठसा उमटवत चर्चेत येतात. २०२१ पर्यंत आयपीएलचे मैदान गाजवणारा सुरेश रैना यंदा समालोचक म्हणून आयपीएलमध्ये फटकेबाजी करतो आहे. त्याला त्याची आयपीएलमधील कामगिरी पाहता मिस्टर आयपीएल ही उपमा देण्यात आली होती. परंतु इंग्लंडचे दिग्गज फलंदाज ग्रीम स्वान यांना असे वाटते की, रैना नव्हे तर शिखर धवन या उपमेचा खरा हक्कदार आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात (IPL 2022) धवन पंजाब संघाचा (Punjab Kings) भाग आहे. त्याने आतापर्यंत या संघाकडून ६ सामने खेळताना ३४.१६ च्या सरीसरीने आणि १२८.९३ च्या स्ट्राईक रेटने २०५ धावा केल्या आहेत. पुण्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने फटकावेल्या ७० धावा ही त्याची या हंगामातील सर्वोच्च खेळी राहिली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
धवनने (Shikhar Dhawan) आतापर्यंत आयपीएलमध्ये १९७ सामने खेळताना ३४.७७ च्या सरासरीने आणि १२६.८६ च्या स्ट्राईक रेटने ५९८० धावा केल्या आहेत. आयपीएल इतिहासात सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक ६७३ चौकार मारले आहेत.
दुसरीकडे सुरेश रैना (Suresh Raina) जरी आयपीएलच्या पंधराव्या हंगामात खेळत नसला तरीही, त्याचीही कामगिरी प्रशंसनीय राहिली आहे. त्याने आयपीएलमध्ये २०५ सामने खेळताना ३२.५२ च्या सरासरीने आणि १३६.७३ च्या स्ट्राईक रेटने ५५२८ धावा चोपल्या आहेत.
असे असले तरीही, स्वान (Graeme Swann)धवनच्या फलंदाजीवर फिदा झाले (Graeme Swann On Shikhar Dhawan) आहेत. त्यांनी स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह या कार्यक्रमात बोलताना धवनला मिस्टर आयपीएल (Mister IPL) संबोधले आहे. तसेच त्यांना त्याची फलंदाजी पाहायला फार आवडते, असे सांगितले आहे. “मला मिस्टर आयपीएल धवनला फलंदाजी करताना पाहायला आवडते,” असे स्वान म्हणाले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शेवटच्या क्षणी विलियम्सनने घेतला डीआरएस, चिडलेल्या पंजाबच्या फलंदाजाची पंचाकडे धाव; पुढे घडलं भलतंच