पुणे, 18 ऑगस्ट 2023: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित 60व्या राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत तिसऱ्या फेरीत फिडे मास्टर छत्तीसगढच्या धनंजय एस याने अव्वल मानांकित ग्रँडमास्टर अभिजीत गुप्तावर काळ्या मोहऱ्यांसह खेळताना मात करुन धक्कादायक निकालाची नोंद केली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथील बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत तिसऱ्या फेरीत पहिल्या पटावरील 2133 रेटिंग असलेल्या धनंजय एस याने 2625 रेटिंग असलेल्या अभिजीत गुप्ताविरुध्द आपल्या दोन्ही घोड्यांचा वापर करून चतुरस्त्र आक्रमण केले. त्यामुळे अभिजीत गुप्ता बचावात्मक स्थितीत गेला. धनंजयने लगेचच आपल्या वजिराच्या साहाय्याने गुप्ताचा बचाव भेदत त्याच्या राजापर्यंत धडक मारली. धनंजयने शहमात करण्याचा इशारा देताच गुप्ताने शरणागती पत्करली.
दुसऱ्या पटावर खेळत असलेल्या एएआयच्या 2611 रेटिंग असलेल्या ग्रँड मास्टर अभिमन्यू पुराणिकने मात्र अत्यंत चुरशीच्या लढतीनंतर बीएसएनएलच्या हेमल थनकीवर मात करताना आपली आगेकूच कायम राखली. पांढरी मोहरी घेऊन खेळणाऱ्या हेमलने अभिमन्यूच्या राजाला चौफेर आक्रमण करून घेरले. परंतु अभिमन्यूने उत्कृष्ट बचाव करताना हे आक्रमण मोडून काढत काळ्या मोहऱ्या निशी खेळताना एक दर्जेदर विजय मिळवला.
तिसऱ्या पटावर ग्रँडमास्टर पीएसपीबीच्या सेतुरामन एसपीने सुरेख सुरुवात करत केरळच्या जॉन अक्कराकरनविरुध्द पांढऱ्या मोहऱ्या निशी खेळताना ओपनिंग पासूनच डावावर वर्चस्व गाजवले व अखेरीस या वर्चस्वाचे विजयात रूपांतरही केले. आणखी एका चुरशीच्या लढतीत ग्रँड मास्टर तामिळनाडूच्या पी इनियान याने अंबरीश शर्मा विरुध्द पांढरा मोहऱ्यानिशी खेळताना स्पर्धेतील अत्यंत वेगवान विजयची नोंद केली. इनियन याने दोन्ही बाजूने आक्रमण करताना अंबरीश ला चकित केले शर्माने दडपणाखाली केलेल्या चुकीचा अचूक फायदा घेत इनीयानने झटपट चाली केल्या व दोन तासाच्या आतच निर्णायक विजयाची नोंद केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: तिसरी फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार:
अभिजीत गुप्ता(पीएसपीबी)(2गुण)पराभुत वि.धनंजय एस(छत्तीसगढ)(3गुण);
हेमल थनकी(बीएसएनएल)(2गुण)पराभुत वि.अभिमन्यू पुराणिक (एएआय) (3गुण);
सेतुरामन एसपी(पीएसपीबी)(3गुण)वि.वि.जॉन अक्कराकरन(केरळ)(2गुण);
दिप्तयन घोष(पश्चिम बंगाल)(3गुण)वि.वि.विघ्नेश वेमुला(तेलंगणा)(2गुण);
कैवल्य नगरे(महा)(2.5गुण) बरोबरी वि.विशाख एनआर(आरएसपीबी)(2.5गुण);
निलसू पट्टनायक(ओडिशा)(2गुण)पराभुत वि.मित्रभा गुहा(पश्चिम बंगाल)(3गुण);
इनियान पी(तामिळनाडू)(3गुण)वि.वि.अंबरीश शर्मा(पश्चिम बंगाल)(2गुण);
यश भराडिया(राजस्थान)(2गुण)पराभुत वि.विघ्नेश एनआर(आरएसपीबी)(3गुण);
सायंतन दास(आरएसपीबी)(3गुण)वि.वि.हर्षित पवार(दिल्ली)(2गुण);
मंदार लाड(गोवा)(2गुण)पराभुत वि.दीप सेनगुप्ता(पीएसपीबी)(3गुण);
अनुप शंकर आर(तामिळनाडू)(2गुण)पराभुत वि आकाश जी(तामिळनाडू)(3गुण);
श्रीराज भोसले(महा)(2.5गुण)बरोबरी वि.नीलाश साहा(आरएसपीबी)(2.5गुण);
व्यंकटेश एमआर(पीएसपीबी)(3गुण)वि.वि.नैतिक मेहता(गुजरात)(2गुण)
बीसी त्रिपाठी(झारखंड)(2गुण)पराभुत वि.अनुज श्रीवत्री(मध्यप्रदेश)(3गुण);
अर्घ्यदीप दास(आरएसपीबी)(3गुण)वि.वि.रामकृष्ण, जे.(तेलंगणा)(2गुण);
कृष्णा सीआरजी(आरएसपीबी)(3गुण)वि.वि.कुशल जानी(गुजरात)(2गुण).
(Grandmaster Abhijit Gupta defeated by Dhananjay S in National Chess Championship 2023 tournament)
महत्वाच्या बातम्या –
‘यांच्या’मुळे जबरदस्त कमबॅक करू शकलो! आयर्लंडला पहिल्या टी-20त मात दिल्यानंतर बुमराहची खास प्रतिक्रिया
BREAKING! रिंकू आणि प्रसिद्ध कृष्णाचे टी-20 पदार्पण, आयर्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात अशी आहे प्लेइंग इलेव्हन