भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर बुधवारी (7 जुलै) त्याच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. धोनीने आपल्या कारकिर्दीत केलेल्या अविस्मरणीय कामगिरी यांची झलक पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे. तर काहींनी धोनीबद्दल भावनिक पोस्ट देखील केलेले आहेत.
भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी धोनीला शुभेच्छा देण्यासाठी काही छान शब्दांची निवड केली आहे. भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीनेही धोनीला खास फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहलीचा संदेश खूप मोठा नसला तरीही धोनीशी त्याचे असलेले चांगले संबंध दाखवणारा आहे.
सध्या इंग्लंडमध्ये भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. जरी विराट भारतामध्ये नसला तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने धोनीला शुभेच्छा देताना लिहिले की, ‘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कर्णधार.’ विराटने ‘कर्णधार’ या शब्दाचा उल्लेख करून असे दाखविले की, धोनी नेहमीच विराटचा कर्णधार होता आणि असेल. विराटने याआधीही अनेकदा हे बोलून दाखवले आहे की त्याच्यासाठी धोनी हा नेहमीच त्याचा कर्णधार असणार आहे.
विराटने 2008 साली एमएस धोनीच्याच नेतृत्त्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने नेहमीच विराटला पाठिंबा दिला होता. विराट कोहलीला 2011 मध्ये धोनीने पाठिंबा देताना 2011 च्या विश्वचषकातील प्रत्येक सामन्यात विराटला खेळवण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये विराटने 9 सामन्यात 282 धावा केल्या. कोहलीने बांगलादेशविरुद्ध नाबाद 100 धावा केल्या होत्या.
Happy birthday skip 💙🇮🇳 @msdhoni pic.twitter.com/ydUQXb7ZzK
— Virat Kohli (@imVkohli) July 7, 2021
धोनी खेळला होता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली
विराट जरी धोनीच्या नेतृत्त्वाखाली पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला असला तरी धोनीच्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व विराटने केले होते. 2019 चा विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध झालेला उपांत्यसामना धोनीचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता.
विराट कोहली व्यतिरिक्त महेंद्रसिंग धोनीला हार्दिक पांड्याने देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. हार्दिक पांड्याने धोनीला भावनिक पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हार्दिकने लिहिले की, ‘ माझे शेवट पर्यंतचे प्रेम आणि माझा सर्वात चांगला मित्र असणाऱ्या माही भाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुमच्यावर फक्त आणि फक्त प्रेम आहे.’
To my forever love and my greatest friend, happy birthday Mahi bhai 🤗 Only love for you ❤️ @msdhoni pic.twitter.com/Fs6BtdWzvR
— hardik pandya (@hardikpandya7) July 6, 2021
महेंद्रसिंग धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता धोनी फक्त इंडियन प्रीमियर लीगच्या सामान्यांमध्ये खेळताना मैदानावर दिसतो.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा; ‘या’ दोन अनुभवी खेळाडूंचे झाले पुनरागमन
जून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकनं जाहीर, भारताच्या ‘या’ २ खेळाडूंचा समावेश