नागपुरचा रहिवाशी असलेला उमेश यादव हा भारतीय तोफखान्यातील एक प्रमुख गोलंदाज आहे. त्याकडे अनेक माजी खेळाडू एक महत्त्वाचा गोलंदाज म्हणून पाहतात. परंतु याच उमेश यादवची जिवनातील कहाणी एकंदरीतच अतिशय खडतर राहिली आहे.
क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी तो पोलीस बनण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याचे वडील नागपूरजवळच्या खापरखेडामधील ‘वेस्टर्न कोल लिमिटेड’ या कोळशाच्या खाणीत काम करत होते आणि कोल इंडिया लिमिटेडच्या कॉलनीमध्येच राहत होते.
उमेशवर संस्कारदेखील इथेच झाले. घरची हालाखीची परिस्थिती ते भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य बनण्यापर्यंतचा प्रवास त्याने खूप मेहनतीने पूर्ण केला.
त्याच्या वडीलांची इच्छा होती की, 2 मुले आणि 2 मुलींपैकी एकाने तरी महाविद्यालयात शिक्षण घ्यावे. परंतु, घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे ते पूर्ण झाले नाही.
घरचा खर्च भागवताना त्यांना खूप समस्या येत होत्या. त्यामुळे उमेशचे महाविद्यालयात शिकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
आईपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळताना 2010मध्ये तान्या वाधवासोबत त्याची भेट झाली. पुढे 2 वर्षांनंतर त्याने तान्याला लग्नासाठी मागणी घातली. त्यानंतर एका वर्षाच्या डेटिंगनंतर दोघांनी मे 2013मध्ये लग्न केले.