fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय क्रिकेटपटूने गर्लफ्रेंडकडून शिकली होती इंग्रंजी, पत्नीसमोरचं द्यावी लागली कबूली

May 16, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खेळताना त्याच्या गोलंदाजीने मोठ-मोठ्या फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत होता. मात्र, या गोलंदाजाला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एका गोष्टीमुळे खूप त्रास सहन करावा लागला होता. ही गोष्ट म्हणजे कोणत्या फलंदाजाची फलंदाजी शैली वगैरे नव्हती, तर ती गोष्ट होती त्याची इंग्रजी भाषा.

हरभजनला त्याच्या इंग्रजीचा सर्वाधिक त्रास तो सामनावीर किंवा मालिकावीर बनल्यावर होत असायचा. त्यावेळी त्याला एकाच गोष्टीची भीती वाटत असायची की, जर प्रश्न विचारणाऱ्याने त्याला इंग्रजीत प्रश्न विचारला तर तो त्याचे उत्तर कसे देईल.

पण, हरभजनने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला आहे की, त्याला त्याच्या श्रीलंकामधील प्रेयसीने इंग्रजी बोलायला शिकवले होते. मजेशीर बाब ही आहे की, त्याने या गोष्टीची कबुली चक्क त्याची पत्नि गीता बसरासमोर दिला आहे. Harbhajan Singh Reveals his secret about english.

हरभजनने या गोष्टीची कबुली ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिली होती. यावेळी बोलताना हरभजन म्हणाला की, “तो ८ वर्षे श्रीलंकामधील प्रेयसीसोबत संबंधात होता. यावेळी तिचे इंग्रजी भाषेतील बोलणे ऐकून मी हळूहळू इंग्रंजी बोलायला शिकण्याचा प्रयत्न करत होतो. सुरुवातीला मी ‘हाऊ आर यु’ असे छोटी छोटी वाक्ये तिला बोलण्याचा प्रयत्न करत असायचो. तिने माझा आत्मविश्वास वाढवला. मी गेल्यावर्षी स्काय स्पोर्टवर इंग्रंजीत समालोचनही केले होते.”

८ वर्षे श्रीलंकातील प्रेससीसोबतच्या संबंधानंतर हरभजनने बॉलिवुड अभिनेत्री गीता बसरासोबत लग्न केले. त्यांचे लग्न २९ ऑक्टोबर २०१५ला जलंधर येथे झाले होते. त्यांना आता हिनाया हीर नावाची मुलगीदेखील आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

युवराजने केलं रोहित, सचिनला ‘हे’ हटके चॅलेंज, पाहुया काय करतात सचिन-…

ठरलं तर! ‘या’ तारखेला टीम इंडिया उतरणार मैदानावर

ऍशेस मालिकेत १ धाव करुन ठरला होता हिरो, आता कोरोनामुळे करियरच आलंय धोक्यात


Previous Post

तो व्यक्ती ‘गेम’ करुन धोनीला काढणार होता संघाबाहेर

Next Post

कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे ५ प्रसिध्द गोलंदाज

Related Posts

Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

April 10, 2021
IPL

किती ते दुर्दैव! रैनाची अर्धशतकी तुफानी खेळी अशा पद्धतीने आली संपुष्टात, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Next Post

कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे ५ प्रसिध्द गोलंदाज

या कंपनीने दिला होता सचिनला धोका, आता मागावी लागली थेट माफी

कोहलीसोडून टीम इंडियाचे कर्णधार होण्यासाठी तयार असलेले ३ खेळाडू

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.