‘हिट विकेट’, म्हणजे एखादा खेळाडू फलंदाजी करत असताना त्याची बॅट यष्टीला लागल्यामुळे बाद होणे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची देखील आज हिट विकेट गेली. अबु धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर चालू असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघातील सामन्यात त्याने हा नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
झाले असे की, कोलकाता संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सुरुवातीला मुंबई संघाचे खेळाडू फलंदाजासाठी मैदानावर उतरले. क्विंटन डी कॉक (३ चेंडू १ धाव), सूर्यकुमार यादव (२८ चेंडू ४७ धावा), सौरभ तिवारी (१३ चेंडू २१ धावा) हे खेळाडू डावातील १६व्या षटकापर्यंत पव्हेलियनला परतले.
त्यामुळे पुढे मुंबई संघाचा दमदार फलंदाज हार्दिक पंड्या फलंदाजासाठी मैदानावर उतरला. त्याने १३ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार ठोकत १८ धावांची दमदार खेळी केली. पण १९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कोलकाता संघाचा खेळाडू आंद्रे रसेलने त्याला हिट विकेट करत तंबूचा रस्ता दाखवला. यासह आयपीएल इतिहासात हिट विकेट झालेल्या खेळाडूंच्या यादीत त्याच्या नावाची भर पडली आहे.
पंड्याव्यतिरिक्त आयपीएल इतिहासात तब्बल १० खेळाडू हिट विकेट झाले आहेत. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात म्हणजे २००८मध्ये मुसविर खोटे आणि मिस्बाह उल हक हिट विकेट झाले होते. तर, २००९ मध्ये स्वप्निल असनोडकर, २०१२ मध्ये रविंद्र जडेजा व सौरभ तिवारी, २०१६मध्ये डेव्हिड वॉर्नर, दिपक हुडा व युवराज सिंग, २०१७मध्ये शेल्डन जॅक्सन आणि २०१९मध्ये रियान पराग अशाप्रकारे बाद झाले होते.
आयपीएल इतिहासात हिट विकेट झालेले खेळाडू
मुसविर खोटे व मिस्बाह उल हक- २००८
स्वप्निल असनोडकर- २००९
रविंद्र जडेजा व सौरभ तिवारी- २०१२
डेव्हिड वॉर्नर, दिपक हुडा व युवराज सिंग- २०१६
शेल्डन जॅक्शन- २०१७
रियान पराग- २०१९
हार्दिक पंड्या- २०२०
महत्त्वाच्या बातम्या-
-वेळ लागला! परंतू धोनीच्या विक्रमाची कार्तिकने केली बरोबरी
-१५ कोटींना खरेदी केलेल्या खेळाडूने पहिल्याच षटकात दिल्या १५ धावा
-मैदानावरील ‘त्या’ घटनेमुळे साक्षी धोनीचा पारा चढला, सोशल मीडियावरुन केली टीका
ट्रेंडिंग लेख-
-फक्त ९० धावा आणि मुंबईचा कर्णधार रोहित घालणार ‘या’ शानदार विक्रमाला गवसणी
-मुंबई-कोलकाता सामन्यामध्ये रोहित, रसलसह ‘या’ खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी
-केवळ चार आयपीएल सामन्यातच झाले ३ मोठे खेळाडू जखमी