भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजमध्ये टी२० मालिका खेळत आहे. त्यानंतर त्यांना झिम्बाब्वे दौरा, आशिया चषक, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिका खेळायच्या आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक खेळला जाईल. त्याआधी, भारतीय संघातील एका फेरबदलाची मोठी बातमी समोर येत आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, अष्टपैलू हार्दिक पंड्या आता टी२० संघाचा नवा उपकर्णधार होऊ शकतो. तो केएल राहुलची जागा घेईल. त्याच्याकडे कायमस्वरूपी ही जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचेही वृत्त आहे. मात्र, यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नाही.
भारतीय संघाचा सध्याचा नियमित उपकर्णधार केएल राहुल सातत्याने संघाबाहेर आहे. तो तंदुरुस्तीशी मोठ्या प्रमाणात झुंजतोय. त्यामुळे आशिया चषकासाठी होणाऱ्या संघ निवडीवेळी निवड समिती हार्दिक पंड्या याला नवा नियमित उपकर्णधार घोषित करू शकते. सध्या तरी तो केवळ टी२० संघाचा उपकर्णधार असेल.
बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना म्हटले,
“हार्दिक हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे आणि तो पूर्ण तंदुरुस्तीसह परतला आहे हे पाहून आनंद होतो. त्याला उपकर्णधार म्हणून निवडायचे की नाही हे निवडकर्त्यांवर अवलंबून आहे. मात्र, तरीही तो संघाच्या प्रमुखांपैकी एक आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून तो फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाजूंनी आपले योगदान देतो. त्याच्याकडे अप्रतिम नेतृत्व कौशल्यही आहे. हे आपण आयपीएलमध्ये पाहिले आहेच.”
कर्णधार म्हणून हार्दिकने यावर्षी प्रथमच आयपीएलमध्ये नव्याने सहभागी झालेल्या गुजरात टायटन्स संघाला विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर आयर्लंड दौऱ्यावर टी२० मालिकेत त्याला भारतीय कर्णधार होण्याचा मान मिळाला. सध्या वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या टी२० मालिकेत रिषभ पंतऐवजी तोच संघाचा उपकर्णधार आहे. त्यामुळे हार्दिक आता टी२० संघाचा नियमित उपकर्णधार बनण्याची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे बोलण्यात येत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ खेळाडू ठरतोय टीम इंडियासाठी लकी! पठ्ठ्याने जेवढे सामने खेळले, तेवढेही सामने संघाने जिंकले
रेणुकाच्या अफलातून गोलंदाजीने विरोधी संघाच्या दांड्या गुल! एकाच व्हिडिओमध्ये पाहा विकेट्सचा थरार
CWG 2022 | भारताचे उत्कृष्ट प्रदर्शन सुरूच, वेटलिफ्टिंगमध्ये गुरदीपने जिंकले दहावे पदक