पुणे | हनुमान आखाड्याच्या हर्षद कोकाटे व खालकर तालीमच्या पृथ्वीराज मोहोळ यांनी अनुक्रमे गादी व माती विभागातील ८६ ते १२५ किलो या महाराष्ट्र केसरी गटात आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
मंगळवार पेठ येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे ६४ व्या राज्य कुस्ती व मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुणे शहर संघाच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माती व गादी गटातून सुमारे २०० खेळाडूंनी या स्पर्धेत विविध वजनी गटातून आपला सहभाग नोंदविला.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर टकले, कार्याध्यक्ष हिंदकेसरी योगेश दोडके, विश्वस्त तात्यासाहेब भिंताडे, सरचिटणीस शिवाजीराव बुचडे, अर्जुनवीर काका पवार, उपमहाराष्ट्र केसरी संतोष गरुड व राजेंद्र मोहोळ, नगरसेवक अजय खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेच्या आयोजनात रवी खालकर, ज्ञानेश्वर मांगडे, गणेश दांगट, अविनाश टकले, योगेश पवार, दत्ता बालवडकर, मंगेश परांडे, जयसिंग आण्णा पवार, सागर भोंडवे, संभाजी आंग्रे, सचिन मोहोळ, पंच प्रमुख रवी बोत्रे, मोहन खोपडे यांनी विशेष मेहनत घेतली.
निकाल पुढील प्रमाणे : गादी विभाग :
५७ किलो : दीपक पवार (प्रथम, कात्रज), मयूर चव्हाण (द्वितीय, गोकुळ वस्ताद)
६१ किलो : सचिन दाताळ (प्रथम, मामासाहेब मोहोळ संकुल), सातीश पुटगे (द्वितीय, दामले प्रशाला)
६५ किलो : रावसाहेब घोरपडे (प्रथम, सह्याद्री संकुल), कौस्तुभ बोराटे (द्वितीय, मामासाहेब मोहोळ संकुल)
७० किलो : शुभम थोरात (प्रथम, शिवरामदादा तालीम), रवींद्र जगताप (द्वितीय, गुलसे तालीम)
७४ किलो : स्वप्नील शिंदे (प्रथम, सुभेदार तालीम), मयूर जुनवणे (द्वितीय, औंधगांव)
७९ किलो :अक्षय चौरघे (प्रथम, मामासाहेब मोहोळ संकुल), रुपेश डोख (द्वितीय, कोथरूड)
८६ किलो :अभिजित भोईर (प्रथम, मामासाहेब मोहोळ संकुल), वैभव तांगडे (द्वितीय, हनुमान आखाडा)
९२ किलो :अक्षय साखरे (प्रथम, मामासाहेब मोहोळ संकुल), अनिकेत गायकवाड (द्वितीय, गोकुळ वस्ताद तालीम)
९७ किलो : नीलेश केदारी (प्रथम, हनुमान आखाडा), पंकज पवार (द्वितीय, कात्रज)
८६ ते १२५ किलो : हर्षद कोकाटे (प्रथम, हनुमान आखाडा), साकेत यादव (द्वितीय,आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल)
माती विभाग :
५७ किलो :अमोल वालगुडे (प्रथम, हनुमान आखाडा), किरण शिंदे (द्वितीय, गोकुळ वस्ताद तालीम)
६१ किलो : प्रवीण हरणावळ (प्रथम, मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल), प्रीतम घोरपडे (द्वितीय, सह्याद्री कुस्ती संकुल)
६५ किलो :प्रीतेश वाघमारे (प्रथम, हनुमान आखाडा), मानस वाघ (द्वितीय, निंबाळकर तालीम)
७० किलो : करण फुलमाळी (प्रथम, हनुमान आखाडा), सौरभ शिंदे (द्वितीय, खालकर तालीम)
७४ किलो : आकाश दुबे (प्रथम, गोकुळ वस्ताद), अक्षय बिरमाने (द्वितीय, हनुमान आखाडा)
७९ किलो : व्यंकटेश बनकर (प्रथम, मुकुंद व्यायामशाळा), अमित गायकवाड (द्वितीय, गोकुळ वस्ताद)
८६ किलो : ओंकार दगडे (प्रथम, हनुमान आखाडा), संतोष पडळकर(द्वितीय, मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल)
९२ किलो : अनिकेत कंधारे (प्रथम, हनुमान आखाडा), अक्षय जाधव (द्वितीय, गराडे तालीम)
९७ किलो : मनीष रायते (प्रथम, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल), तन्मय रेणुसे (द्वितीय, निंबाळकर तालीम)
८६ ते १२५ किलो : पृथ्वीराज मोहोळ (प्रथम, खालकर तालीम), तानाजी झुंजूरके (द्वितीय, हनुमान आखाडा)