कोरोना या साथीच्या आजारामुळे काहीकाळ कोणत्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाले नाही. मात्र जवळपास ४ महिन्यांच्या विश्रांतीनंतर जैव सुरक्षित वातावरणात क्रीडा स्पर्धांचे आयोजन होऊ लागले. नुकतीच आयपीएल ही टी20 स्पर्धाही जैव सुरक्षित वातावरणात पार पडली.
आता जगभरात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. यातच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वनडे, 3 टी20 आणि 4 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. मात्र या मालिकेनंतरही भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध मालिका खेळायची आहे.
फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत होईल सामने- गांगुली
लिव्हिंग गार्ड एजीने आयोजित केलेल्या एका वर्चुअल पत्रकार परिषदेत बोलताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, “इंग्लंड क्रिकेट संघ चार कसोटी, तीन वनडे आणि पाच टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौरा करेल. फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत या मालिकेचे आयोजन केले जाईल.”
परिस्थितीचे करावे लागेल आकलन
पुढे बोलताना गांगुली म्हणाले की, “द्विपक्षीय मालिका घेणे सोपे आहे, कारण त्यात फक्त दोनच संघ असतात. आम्हाला परिस्थितीचे आकलन करावे लागेल. कोव्हिड-19 ची दुसरी लाट येण्याचीही चर्चा आहे. आम्हाला सतर्क राहावे लागेल.”
आयपीएल भारतात आयोजित करण्याचे करू प्रयत्न
आयपीएलच्या पुढील हंगामाविषयी बोलताना गांगुली म्हणाले की, “आयपीएल ही स्पर्धा भारतातच व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. ही स्पर्धा भारतीयांसाठी आहे. मी बर्याचदा लोकांना सांगतो की भारतासाठी आयपीएलचे काय महत्व आहे हे पाहण्यासाठी तुम्ही येथे यायला हवं.”
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ सज्ज
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्याबद्दल बोलताना गांगुली म्हणाले की, “सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये आहे. या संघाने क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाची आणखी कोणतीही प्रकरणे आढळली नाहीत. मैदानावर पाऊल ठेवण्यास खेळाडू सज्ज आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘रोहित शर्मा नेतृत्त्वाच्या बाबतीत विराटपेक्षा जास्त समजदार,’ भारतीय खेळाडूचे मोठे वक्तव्य
दशकातील सर्वोत्तम खेळाडू! आयसीसीच्या पुरस्कारासाठी विराट कोहलीला नामांकन, ‘हे’ सहा खेळाडूही शर्यतीत
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘ही’ जर्सी घालून टीम इंडिया उतरणार मैदानात, शिखर धवनने फोटो केला शेअर
ट्रेंडिंग लेख –
-अविस्मरणीय! भारतीय चाहते कधीही विसरू न शकणार नाहीत अशा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ३ खेळी
टीम इंडियाचं हे ‘त्रिकुट’ उडवू शकतं ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या सर्वाधिक दांड्या
श्वास रोखून धरा! आगामी वनडे मालिकेत ‘हे’ तीन भारतीय पाडू शकतात धावांचा पाऊस