विराट कोहली जरी सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममध्ये असला, तरी त्याच्या चाहत्यांमध्ये जराही घसरन झाल्याचे दिसत नाही. मागच्या मोठ्या काळापासून विराट चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाहीये, पण तरीही चाहते त्याच्या मोठ्या खेळीच्या प्रतिक्षेत आहेत. जगभारीत दिग्गज खेळाडूही विराटला पुन्हा चांगल्या फॉर्ममध्ये येण्यासाठी वेगवेगळे सल्ले देत आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फंलदाज कामरान अकमलने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने स्वतःला विराटचा एक मोठा चाहता देखील सांगितले.
कामरान अकमल (Kamran Akmal) त्याच्या यूट्यूब चॅलनवर बोलत होता. विराट कोहली (Virat Kohli) सध्या ज्या प्रकारचे खराब प्रदर्शन करत आहे, त्यावरही त्याने प्रतिक्रिया दिली. अकमल म्हणाला की, “हे स्पष्टपणे कळत आहे की, भारतीय संघ संघर्ष करत आहे, कारण विराट कोहली धावा करत नाहीये. हा भारतीय संघ त्याच्यावर खूप अवलंबून आहे. त्याने स्वतःच्या जोरावर भारताला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. मागच्या सामन्यात बाद होण्यापूर्वी तो अप्रतिम फलंदाजी करत होता. त्याचे खेळाप्रतीचे समर्पण दुसऱ्यांसाठी उदाहरण आहे. जेव्हा तो फॉर्ममध्ये येईल, तेव्हा भारताचेही प्रदर्शन सुधारेल.”
कामरान अकमलच्या मते जगभारतील चाहते विराटला पुन्हा एकदा मोठी खेळी करतान पाहू इच्छितात.”जेव्हा असा एखादा खेळाडू फॉर्ममध्ये असतो, तेव्हा युवा खेळाडूंना त्याच्याकडून खूप प्रेरणा मिळते. मी देखील त्याचा एक चाहता आहे. तो जितक्या लवकर फॉर्ममध्ये येईल, तेवढे चांगले असेल. चाहते त्याला पुन्हा एकदा धावा करताना पाहू इच्छितात,” असे तो पुढे बोलताना म्हणाला.
विराट कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत एकूण ७० शतक ठोकले आहेत. जगातिक क्रिकेटमध्ये विराट सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, मागच्या अडीच वर्षांपेक्षा मोठ्या काळापासून त्याच्या बॅटमधून एकही शतक निघाले नाहीये. विराटने शेवटचे शतक १९ नोव्हेंबर २०१९ रोजी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात केले होते. चाहते त्याच्या ७१ व्या शतकाची आतुरतने वाट पाहत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘तुमसे ना हो पायेगा!’ शेवटच्या चेंडूवर फ्री हिट मिळूनही बलाढ्य संघाने गमावला सामना
टीम इंडियाचे ‘हे’ स्टार खेळाडू वेतन घेणार ७ कोटी, खेळणार मात्र २१ टक्केच
रोहित की विराट? कोणी गाजवलंय मँचेस्टरचं मैदान, एका क्लिकवर घ्या जाणून