त्रिनिदादमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात आमने-सामने आले आहेत. या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवशी भारताने 84 षटकात 4 विकेट्स गमावत 288 धावा केल्या. भारताकडून विराट कोहली नाबाद 87 धावांवर खेळत आहे. पहिल्या दिवशी तोच भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला. या खेळी दरम्यान त्याने ज्या प्रकारचा खेळ दाखवला ते पाहून वेस्ट इंडीजचे दिग्गज क्रिकेटपटू आणि समालोचक यांनी त्याचे विशेष कौतुक केले.
विराटने आपल्या या खेळी दरम्यान अगदी चलाखीने एकेरी दुहेरी धावा देखील घेतल्या. अशीच एक धाव घेताना विराटने सूर मारत ही धाव पूर्ण केली. त्यावेळी समालोचन करत असलेले बिशप म्हणाले,
“हा तोच खेळाडू आहे जो आपला 500 वा सामना खेळतोय. मात्र, त्याला प्रत्येक धावेची मूल्य माहित आहे. तो एका एका धावेसाठी स्वतःला झोकून देताना दिसतोय. याला समर्पण म्हणतात. मी आपल्या येथील प्रत्येक युवा खेळाडूला सांगेल असेच धावां करता धावायला हवे. प्रत्येक वेळी चौकारांची वाट पाहू नका”
विराट कोहली (Virat Kohli) वेस्ट इंडिजविरुद्ध त्याचा 500वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. त्याच्याकडून सर्वांना शतकाची अपेक्षा असेल. हे त्याच्या कारकिर्दीतील 76 वे आंतरराष्ट्रीय शतक असेल. तसेच, 500 व्या सामन्यात शतक पूर्ण करणारा तो जगातील पहिला फलंदाज बनेल. भारतीय संघाकडे आपल्या पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याची संधी असेल. भारतीय संघाने डॉमिनिका येथे झालेला मालिकेतील पहिला सामना तीन दिवसांमध्ये आपल्या नावे केला होता. हा सामना जिंकून मालिका क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल.
(Ian Bishop Praised Virat Kohli For His Efforts While Batting)
महत्त्वाच्या बातम्या-
WI vs IND । ‘हे’ आहे शार्दुलला बाहेर बसवण्याचं कारण, समोर आली महत्वाची माहिती
नारायणच्या फिरकी गोलंदाजीचा अमेरिकेत राडा, स्टार फलंदाजाचा पहिल्यांदाच सामना करताना दाखवला तंबूचा रस्ता