---Advertisement---

“ड्रिंकदरम्यान शास्त्रींनी सांगितले, ‘हा’ असेल टीम इंडियाचा तिसरा वेगवान गोलंदाज”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचा खुलासा

On: गुरूवार, डिसेंबर 10, 2020 5:14 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर 17 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. तीन – तीन सामन्याची वनडे आणि टी-20 मालिका संपली आहे आणि आता संपूर्ण लक्ष कसोटी मालिकेवर असणार आहे. भारतीय कसोटी संघात जसप्रीत बुमराह, मोहमद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाज म्हणून सहभागी आहेत. अशात प्लेईंग इलेव्हनमध्ये बुमराह आणि शमी यांचे खेळणे निश्चित आहे. त्यामुळे ईशांत शर्माच्या अनुपस्थितीत तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून कोणाला संधी द्यायची?, हा प्रश्न संघ व्यवस्थापकांपुढे आहे. याबद्दल ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी खुलासा केला आहे.

ते म्हणाले की, तिसर्‍या वेगवान गोलंदाजांची भूमिका कोण निभावेल?, हे भारतीय क्रिकेटचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी त्यांना सांगितले आहे.

तिसरा वेगवान गोलंदाज उमेश यादव असणार
स्क्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, चॅपेल म्हणाले, मी रवी शास्त्रींसोबत ड्रिंक घेत होतो आणि त्यांनी मला सांगितले की तिसरा गोलंदाज म्हणून उमेश यादव खेळण्यासाठी उतरेल.” सैनी, सिराज आणि यादव यांच्यात यादव हा अनुभवी गोलंदाज आहे.

‘भारतीय संघाकडे बुमराह आणि शमीच्या रूपात स्मार्ट गोलंदाज’
चॅपेल पुढे बोलताना म्हणाले, “भारतीय संघाकडे बुमराह आणि शमी यांच्या रूपाने दोन स्मार्ट वेगवान गोलंदाज आहेत. जर तुम्ही मला विचाराल, तर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने 300 धावा केल्या, तर मग ऍडलेडमध्ये त्यांची कसोटी जिंकण्याची शक्यता जास्त आहे.” चॅपेल यांनी याशिवाय अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाची भरपूर प्रशंसा केली.

विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर पालकत्व रजा घेत आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतणार आहे आणि अशात भारतीय संघाची कमान अजिंक्य रहाणे सांभाळेल.

महत्त्वाच्या बातम्या-

तब्बल १० खेळाडू कसोटी मालिकेपूर्वी परतणार भारतात, पाहा संपूर्ण यादी

विराट! शेतकरी मोर्चात सहभागी हो, चिडून चाहत्याने केले आवाहन

पाकिस्तान क्रिकेटला अच्छे दिन, तब्बल १४ वर्षांनी ‘हा’ संघ करणार पाकिस्तान दौरा

ट्रेंडिंग लेख-

शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ

अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’

अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेल खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---