भारतीय क्रिकेटसाठी शनिवार (26 ऑगस्ट) ऐतिहासिक ठरला. भारतीय महिलांच्या अंध संघाने आयएसबीए वर्ल्ड गेम्स 2023च्या अंतिम सामन्यात विजय मिळवून सुवर्ण पदक जिंकले. अंतिम सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला भारताने 9 विकेट्सने मात दिली. या सामन्याचा निकाल डिएलएस पद्धतीने लागला.
आयबीएसए वर्ल्ड गेम्समध्ये पहिल्यांदाच क्रिकेटला लामील करण्यात आले. भारताचे पुरुष आणि महिला हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचले होते. त्यातील महिला संघाने 140 कोटी भारतीयांसाठी शनिवारी अभिमानास्पद कामगिरी केली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला अंध संघाने प्रथम फलंदाजी करत 8 विकेट्सच्या नुकसानावर 115 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय महिला अंध संघ फलंदाजीला आल्यानंतर पावसाने व्यत्यय आणला. पाऊस येण्यापूर्वी भारताने 3.3 षटकांमध्ये 43 धावा केल्या होत्या. पाऊश न थांबल्यामुळे भारताला डिएलएस नियमानुसार विजयी घोषित करण्यात आले आहे. अंध संघाने जिंकलेले हे पहिले सुवर्ण पदक असून भारताच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे.
भारतीय महिला अंध संघाची प्लेइंग इलेव्हन –
वर्षा यू (कर्णधार), व्ही रवाणी, एस दास, पी तुडू, जी नीलप्पा, बी हंसदा, एस डेव्हिस, दीपिका टीसी, पी सरेन, एस पटेल, एम सत्यवती (यष्टीरक्षक)
ऑस्ट्रेलियन महिला अंध संघाची प्लेइंग इलेव्हन –
सीबी बुआखाओ, सी केसी, जे न्यूमन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सी लुईस, ए मालोन, सी वेबेक, ए रो, आय मॅकेना, टी व्हेलन, जे पॅरी, डी फेरीस
(ibsa world games 2023 india womens blind cricket team won final and claim gold medal )
महत्वाच्या बातम्या –
धोनी आणि मोहीत शर्मात नेहमी होते ‘या’ गोष्टीची चर्चा, वेगवान गोलंदाजाकडून खुलासा
कसोटीनंतर वनडे फॉरमॅटमधील वॉर्नरची जागा धोक्यात? विश्वचषकापूर्वी संघ घेणार मोठा निर्णय