आयसीसीने सोमवारी (३ मे) वनडे रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये केन विलीयमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाला मोठा फायदा झाला आहे. न्यूझीलंड संघाने नुकतेच बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत बांगलादेश संघाला ३-० ने पछाडले होते. याचाच फायदा त्यांना वनडे रँकिंगमध्ये झाला आहे. न्यूझीलंड संघाने १२१ रेटिंग पॉइंट्ससह आयसीसीच्या वनडे संघाच्या यादीत पहिले स्थान गाठले आहे.
ही वनडे रँकिंग १ मे २०१८ नंतर झालेल्या सामन्यांच्या निकालावरून जाहीर करण्यात आली आहे. २०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या सामन्यांच्या निकालातून ५० टक्के आणि २०२० मध्ये झालेल्या सामन्यांच्या निकालांवरून ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विश्वचषक २०१९ स्पर्धेचाही समावेश आहे. आतापर्यंत इंग्लंड संघ या यादीत सर्वोच स्थानी होता. परंतु आता न्यूझीलंड संघाने बाजी मारली आहे.
या यादीत सर्वोच्च स्थानी असलेला इंग्लंड संघाची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. तर तिसऱ्या स्थानी असलेला न्यूझीलंड संघ पहिल्या स्थानी आला आहे. तसेच भारतीय संघ तिसऱ्या स्थानी आहे आणि ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. न्यूझीलंड संघाने श्रीलंका, भारत आणि बांगलादेश संघांना वनडे पराभूत केले होते. यासोबतच २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाने अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे न्यूझीलंड संघ पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे.
तर इंग्लंड संघाला, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाकडून पराभवाचा फटका बसला होता. त्यामुळे इंग्लंड संघाच्या रँकिंगमध्ये घसरण झाली आहे.
आयसीसीने जाहीर केलेली वनडे संघाची क्रमवारी
१) न्यूझीलंड : (१२१ रेटिंग पॉइंट्स)
२)ऑस्ट्रेलिया : (११८ रेटिंग पॉइंट्स)
३) भारत : (११५ रेटिंग पॉइंट्स)
४)इंग्लंड : (११५ रेटिंग पॉइंट्स)
५)दक्षिण आफ्रिका : (१०७ रेटिंग पॉइंट्स)
६)पाकिस्तान : (९७ रेटिंग पॉइंट्स)
७) बांगलादेश : (९० रेटिंग पॉइंट्स)
८) वेस्ट इंडिज : (८२ रेटिंग पॉइंट्स)
९) श्रीलंका : (७९ रेटिंग पॉइंट्स)
१०) अफगाणिस्तान : (६२ रेटिंग पॉइंट्स)
महत्त्वाच्या बातम्या-
आवड, स्टाईल की अजून काही; एकवेळ डोक्यावर भरगच्च केस असलेला गब्बर आता का ठेवतो टक्कल? वाचा
भर मैदानात शिखर धवनने दिली हार्ट अटॅक आल्याची रिऍक्शन, असं नेमकं काय घडलं? घ्या जाणून