भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत येते. अनुष्का शर्मा सध्या विराटसोबत आहे. याच दरम्यान अनुष्का शर्मा सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच अनुष्काला मुलगी वामिकासोबत हँगआऊट करताना स्पॉट करण्यात आले होते. इंग्लंडमध्ये अनुष्का वामिकाला फिरवताना दिसून आली. (In England, Anushka was seen walking in this look with her daughter Wamika)
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अनुष्का शर्माने एक मोठा ब्राऊन कोट घातलेला दिसून येत आहे. त्याचबरोबर अनुष्काने केसांची वेणी घातली आहे. परंतु सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये वामिकाचा चेहरा दिसून येत नाही. अनुष्काचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CQtZkd4sCvb/?utm_source=ig_web_copy_link
त्याचसोबत अनुष्काच्या या फोटोवर चाहते आपली प्रतिक्रिया देत आहेत. अनुष्काच्या या फोटोला चाहत्यांनी खूप पसंत केले आहे. विराट आणि अनुष्काची मुलगी वामिकाची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूप आतुरले आहेत. परंतु विराट आणि अनुष्काने तिला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वामिकाचा अजून एकही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला नाही.
विराट आणि अनुष्का आणि घेतला हा निर्णय
काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एका लाईव्ह कार्यक्रम आयोजित केला होता. याचदरम्यान एका चाहत्याने विराटला प्रश्न विचारला होता की, ते आपल्या मुलीला किती दिवस सोशल मीडियापासून दूर ठेवणार आहेत? या प्रश्नाला उत्तर देत विराट म्हणाला की, “मी आणि अनुष्काने असा निर्णय घेतला आहे की, जोपर्यंत वामिकाला सोशल मीडिया काय आहे हे समजत नाही, तोपर्यंत आम्ही तिला सोशल मीडियासमोर आणणार नाही.” त्याच बरोबर विराट पुढे म्हणाला की, “वामिकाने सोशल मीडियाचा वापर करायचा की नाही हा निर्णय तिने स्वतः घ्यायचा आहे.”
विराट आणि अनुष्काने चार वर्षांपूर्वी म्हणजेच ११ डिसेंबर, २०१७ रोजी लग्नगाठ बांधली होती.
महत्वाच्या बातम्या-
सानियाचे ‘ग्रँड कमबॅक’! विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत मिळवला विजय, मुलाने वाढविला उत्साह
जेव्हा वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाला जगातील सर्वात कमजोर संघाने दाखवला होता चांगलाच इंगा
“मी अशा खेळाडूंच्या कानशिलात लगावली असती,” विश्वविजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया