भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या कसोटी मालिकेत भारतीय संघाची कामगिरी खूपच खराब राहिली. भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे संघाच्या नावावर एक लाजिरवाणा रेकाॅर्ड नोंदला गेला आहे. खरे तर, 2 किंवा 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिल्यांदाच भारतीय संघाचे फलंदाज सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
2 किंवा 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत खातेही न उघडता बाद होण्याच्या बाबतीत भारतीय फलंदाज शीर्ष स्थानी पोहोचले आहेत. या मालिकेत भारतीय संघाचे 13 फलंदाज खाते न उघडताच तंबूत परतले आहेत. या यादीत आकाश दीपचे (Akash Deep) नाव 13व्या क्रमांकावर आहे. आकाश दीप या मालिकेतील भारताचा 13वा फलंदाज ठरला आहे जो खाते न उघडताच बाद झाला.
याआधी भारताचे 12 फलंदाज शून्यावर बाद होण्याचा रेकाॅर्ड इंग्लंडच्या नावावर होता, वास्तविक 1974 मध्ये भारताचे 12 फलंदाज खाते न उघडताच बाद झाले होते. 1999/2000 मध्ये भारतीय संघाचे 10 फलंदाज खाते न उघडताच बाद झाले होते. तर 2021/2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत 10 भारतीय फलंदाज खाते न उघडता बाद झाले होते.
भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळाबद्दल बोलायचे झाले, तर दुसऱ्या दिवशी भारताचे वर्चस्व राहिले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने 143 धावांची आघाडी घेतली आहे. पण न्यूझीलंड संघाच्या 9 विकेट्स पडल्या आहेत. भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन दाखवत न्यूझीलंडच्या फलंदाजांना डोकं वर काढू दिलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; पंजाब किंग्ज बनणार सर्वात मजबूत संघ, नवीन प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य!
रिषभ पंतवर भडकला रोहित शर्मा, VIDEO होतोय जोरदार व्हायरल
IND vs NZ; मुंबई कसोटीत भारताचे वर्चस्व! दुसऱ्याच दिवशी न्यूझीलंडचे 9 गडी तंबूत