भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Women Cricket Team) सध्या न्युझीलंड दौऱ्यावर असुन यजमान संघासोबत एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर महिला क्रिकेट संघाला न्युझीलंडमध्येच विश्वचषक (ICC Women World Cup 2022) खेळायचा आहे. परंतु ५ वर्षानंतर या फाॅरमॅटमध्ये पुनरागमन करणाऱ्या भारतीय संघाची स्पर्धेपूर्वीची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नाही झाली. न्युझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्य़ांत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताची उपकर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही बऱ्याच दिवसांपासून खराब कामगिरी करत आहे. त्यामुळे भारताच्या माजी कर्णधार डायना एडल्जी (Diana Edulji) यांनी तीला संघातून वगळण्याची मागणी केली आहे.
हरमनप्रीतने मागील काही दिवसांपासून एकही मोठी खेळी खेळलेली नाही. त्यामुळेच संघाची फलंदाजी सुद्धा पुर्णपणे य़शस्वी होत नाहीये. पाच वर्षांपूर्वी तीने इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात शानदार खेळी करत उपांत्य फेरीत १७१ धावा केल्या होत्या त्यानंतर तीने एकही मोठी खेळी खेळली नाही.
शुक्रवारी होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापुर्वी एका वृत्तसंस्थेशी बोलताना डायना म्हणाल्या की, हरमनप्रीतला पुढील सामन्यातून बाहेर करण्याची वेळ आली आहे. त्या म्हणाल्या, “जेमिमा रॉड्रिग्जला वगळण्यासाठी जे मापदंड वापरले होते, तेच मापदंड हरमनप्रीतला लागू झाले पाहिजेत. मी तीच्यावर खूप नाराज आहे. ती माझी आवडती खेळाडू होती पण फक्त एका डावाच्या जोरावर (२०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७१ धावा) तुम्ही संघात राहू शकत नाही. मोठी धावसंख्या करण्यासाठी ती फक्त एक डाव दूर आहे पण प्रयत्न दिसला पाहिजे.”
हरमनप्रीतने मागील ५ वर्षांमध्ये फक्त दोनवेळाच ५० चा आकडा पार केला आहे. तिला प्लेंइग इलेव्हनमधील स्थानावर प्रश्न उपस्थित केले जाण्याचे हेच एकमेव कारण आहे. तसेच तीने मागील वर्षी द हंड्रेड आणि बिग बॅश लीगमध्ये चमकदार कामगिरी केली असली तरी, भारतीय संघासोबत अशी कामगिरी करण्यात ती पुर्णता अपयशी ठरली आहे.
कर्णधारपदाच्या मुद्द्यावरही डायना म्हणाल्या की, “कर्णधारपदाच्या बाबतीतही मितालीनंतर स्मृती सर्व फॉरमॅटमध्ये पुढे आहे. कारण, हरमनप्रीत चांगली कामगिरी करत नाहीये. तिला पुढील सामन्यातून वगळण्यात मला कोणतीही अडचण नाही. स्नेह राणा त्या स्थानासाठी चांगला पर्याय आहे.”
युवा सलामीवीर शफाली वर्मालाही पुढच्या सामन्यासाठी वगळण्यात यावं, असेही माजी भारतीय कर्णधार म्हणाल्या आहेत. शेफालीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, “शफालीला चांगले तयार करणे आवश्यक आहे. ती स्क्वेअर लेगच्या दिशेने सरकत खेळत आहे. तीच्या भूमिकेत स्थिरता नाही. मला याचे कारण माहित नाही.”
भारतीय संघाची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना आता क्वारंटाईनच्या बाहेर आहे आणि तिसऱ्या एकदिवसीयमध्ये तिचे प्लेइंग इलेव्हनमध्ये परतणे जवळपास निश्चित आहे. अशा परिस्थितीत शफालीच्या जागेला धोका निर्माण झाला आहे. मंधानाच्या अनुपस्थितीत एस मेघनाने प्रभावित केले आहे आणि अशा परिस्थितीत तिला संधी दिली जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या-
बंगालच्या क्रीडामंत्र्यांनी रणजीच्या रणांगणात रचला इतिहास! (mahasports.in)
पीएसएलमध्ये गायले गेले धोनीचे गुणगान! समालोचक म्हणाले, “आता तोच या खेळाडूला सुधरवेल” (mahasports.in)
किमतीत विकले गेलेले ‘हे’ खेळाडू ठरु शकतात आयपीएलमध्ये ‘गेमचेंजर’ (mahasports.in)