भारत भूमीवर सुरू असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील टी२० मालिकेत पाहुण्या संघाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. दिल्ली येथील पहिला टी२० सामना जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने कटक येथील दुसऱ्या टी२० सामन्यातही भारतीय संघाला ४ विकेट्सने पराभूत केले. भारतीय संघाच्या १४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची गाडी रुळावरून घसरत होती. परंतु हेन्रिच क्लासिन हा संघासाठी तारणहार ठरला. त्याने धुव्वादार अर्धशतक करत संघाला विजय मिळवून दिला.
या विजयासह (INDvsSA) टी२० मालिकेत २-० अशी (T20 Series) आघाडी घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा (South Africa Captain Temba Bavuma) याने लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. हातून निसटता सामना जिंकण्यासाठी त्याने युक्तीवाद वापरला असल्याचे बावुमाने सांगितले आहे.
सामन्यानंतर मुलाखतीत बोलताना बावुमा (Temba Bavuma Interview) म्हणाला की, “भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नव्हते. भुवनेश्वर कुमारने चांगली गोलंदाजी केली. अशात आम्हाला सामना फिरवण्यासाठी कोणची तरी गरज होती. त्यामुळे मी माझा गेम खेळला. आम्हाला माहिती होते की, या मैदानावर आव्हानाचा पाठलाग करणे सोपे नव्हते. परंतु आम्ही आश्वस्त होतो. आम्हाला आम्ही आखलेल्या योजनांची अंमलबजावणी (South Africa Team plan) करायची होती.”
“आम्ही डेविड मिलरला या सामन्यात ५ किंवा ६ व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरवायचे ठरवले होते. तसेच हेन्रिच क्लासेन (Heinrich Klassen) प्रत्येकी १-२ चेंडूंनंतर मोठे फटके मारत असतो, म्हणून त्यालाही वापरायचे आम्ही ठरवले होते. क्लासेन आमच्या फलंदाजी फळीचा मजबूत खांब आहे,” असे पुढे बावुमा म्हणाला.
पुढे स्वतबद्दल बोलताना त्याने म्हटले की, मला खेळादरम्यान आपला गेम खेळण्याची सवय आहे. मी नेहमी ही भूमिका निभावत असतो. आपली भूमिका कोणतीही असतो, आपण जितके शक्य होईल तितकी ती भूमिका चांगल्या पद्धतीने निभावण्याचा प्रयत्न करायचा. मी या सामन्यातून शिकवण घेतली आहे, पुढील सामन्यात आणखी चांगले करण्यासाठी प्रयत्न करेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सामना हातात असताना ‘इथे’ झाली चूक, नाहीतर विजय आमचाच होता; रिषभ पंतची प्रतिक्रिया
भारत-दक्षिण आफ्रिकेतील सामन्याला ओडिसाच्या CM पटनायक यांनी लावली उपस्थिती, गांगुलीशीही गाठभेट